काही दिवसांपूर्वीच वंडर वुमन सिरीज मधला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तेव्हापासून प्रत्येकाच्या तोंडात वंडर वुमन अर्थात गॅल गॅडोटचे नाव आहे. डीसी कॉमिक्सच्या पात्रावर आधारित, ह्या चित्रपटात गॅलने डायना नावाच्या अ‍ॅमेझॉनच्या राजकुमारीची भूमिका साकारली जी नंतर वंडर वूमन बनते. तिने केलेल्या चि’त्त’थ’रा’र’क स्टँट्स आणि अभिनयामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पण तुम्हाला माहित आहे काय की गॅल सौंदर्य स्पर्धक विजेता आहे आणि मिस युनिव्हर्स 2004 स्पर्धेत तिने इस्राईलचे प्रतिनिधित्व केले होते? ह्यापेक्षा खास गोष्ट तर ही आहे की ह्या स्पर्धेत ती आपल्या सर्वांची ‘आशिक बनाया आपने’ फेम तनुश्री दत्ता कडून हरली होती.

2004 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत वयाच्या केवळ 18व्या वर्षी गॅल मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी पात्र झाली होती. तिने ह्या स्पर्धेत इस्राईलचे प्रतिनिधित्व केले होते तर त्याच वर्षी तनुश्री दत्ता हिने ह्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

सध्या ट्विटरवर 2004 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची यादी फार ट्रेंड होत आहे. ह्यात दिसून येतं की ह्या स्पर्धेत तनुश्रीने आठवं स्थान पटकावलं होतं तर गॅल टॉप 15 मध्ये ही स्थान मिळवू शकली नव्हती.

ह्या स्पर्धेविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 32 वर्षीय गॅलने ही कबुली दिली की, मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकताना तिला नेमकंच मिळालेल्या प्रसिद्धीचे काय करावे हे माहित नव्हते आणि म्हणूनच तिने इक्वाडोर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती स्वतःला सादर करू शकली नाही. तिच्या “स्वारस्याच्या कमतरतेवर” प्रकाश टाकत “जागतिक व्यासपीठावर इस्राईलचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावर ओढवली आणि मी ती मी खूप हलक्यात घेतली.” असेही ती म्हणाली.

तनुश्री आणि गॅलच्या करियरचा आढावा घेतला तर कळतं की वेळ फार लवकर बदलते. एकेकाळी मिस युनिव्हर्स स्पर्धेत आठवं स्थान प्राप्त करणारी आणि आशिक बनाया आपने, हॉ’र्न ओके प्लीज, अपार्टमेंट, गुड बॉय, बॅड बॉय आणि रमा: द सेव्हियर ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तनुश्री आज सिनेमांपासून दूर आहे.

तर दुसरीकडे गॅल जागतिक स्तरावर आज मोठया नावांपैकी एक नाव आहे. अनेकांच्या आवडत्या सुपरहिरोजच्या यादीत तिचं नाव येतं. नुकताच तिच्या वंडर वूमन ह्या सिनेमाने सुरुवातीच्या आठवड्यातच जगभरात 223 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.