पूर्वी भावेचा नृत्याविष्कार
सूत्रसंचालक, डान्सर आणि अभिनेत्री अशी तिहेरी रूपं अत्यंत सहजरित्या हाताळणाऱ्या पूर्वी भावेलासगळेच ओळखतात. लहानपणापासूनच कलाक्षेत्रात काहीतरी करून दाखवायची जिद्द असणाऱ्यापूर्वीने या क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती सूत्रसंचालन आणि अनेकनाटकांमध्ये काम करून उत्तम कलाकार म्हणून नावारूपास आली. भरतनाट्यम संपूर्णपणेआत्मसात करून ती एक उत्तम डान्सर आहे हे हि तिने दाखवून दिलं आहे. डॉ. संध्या पुरेचा ह्या
तिच्या गुरु आहेत. भरतनाट्यमच संपूर्ण शिक्षण तिने तिच्या गुरूंकडून घेतलं. विशेष म्हणजे त्यातील एक विशिष्ट नृत्य प्रकार असलेले मार्गम ह्याचे धडे तिने घेतले. नुकतंच मार्गमलोकांपर्यंत पोहचावा आणि ते नक्की काय आहे हे लोकांना कळावं म्हणून एक कार्यक्रमआयोजित केला होता ज्यात पूर्वीने हे मार्गम नृत्य करून लोकांना त्याचे वैशीष्ट्य आणि त्यातीलविविधता समजवून दिली. सध्याचा काळात सगळेच पाश्चिमात्य डान्सकडे वळत असताना पूर्वीने मात्र आपल्या मातृभूमीतील नृत्य स्वीकारण्याचा निर्णय घेऊन आजच्या युवा पिढी समोर एकआदर्श मांडला आहे. तिच्यामते आपल्या देशात विविध नृत्य प्रकार आहेत जे आपणचजोपासायला हवे. मार्गम या पूर्वीच्या नृत्याविष्कारमुळे तिचा हा वेगळा पैलू देखील प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांना ती सूत्रसंचालक, अभिनेत्री इतकीच एक नृत्यांगणा म्हणून देखील भावली
यात शंकाच नाही.
Poorvi Bhave Photos