“होया बसयू” हे एका रोमानिया या देशातील ट्रांसल्वेनिया या प्रदेशात वसलेल जंगल आहे. खरतर या जंगलाची मुळ खासीयत म्हणालं तर इथे जाताच तुम्हाला शांती लाभल्याप्रमाणे गंध येईल. पण काही बाबी इथे अशा घडतात ज्यात भरपूर सारे रहस्य दडून राहिले आहेत. या रहस्यांपैकी मोठ रहस्य म्हणाल तर या जंगलात काहीशी भितीदायक प्रकारे इथल्या वृक्षांची मांडणी आपल्याला पहायला मिळते, जेणेकरून इथे येणारा आधीच घाबरत या जंगलात पाऊल टाकतो.
या जंगलात आजवर बऱ्याच घटना घडल्या परंतु उलगडा मात्र कोणालाही आजवर करता आला नाही. “होया बसयू” या जंगलाला रोमानियातील “बर्मुडा ट्रॅंगल” असही संबोधलं जातं. या अर्थी आपण एक अनुमान लावू शकतो की इथे बऱ्याच गोष्टी गायबदेखील झाल्या आहेत किंबहुना होतात. संपूर्ण ७०० एकराच्या परिसरात विस्तीर्ण असलेलं हे जंगल आहे आणि मुळात पश्चिम भागातल्या क्लूज नेपोका या शहरापासून हे सर्वाधिक जवळ आहे.
या जंगलाच्या परिसरात पूर्वी काही आदीवासी जमातींसारख्या लोकांचा वास असायचा तेव्हा त्यांनी या जंगलात यु. एफ. ओ पाहिल्याचा दावा केला आहे. थोडक्यात म्हणणं असं की, एलियन्स इथल्या भागात काही प्रमाणात वास्तव्य करून पुन्हा परतत असतील ही शक्यता वर्तविण्यात येते.
या जंगलाबद्दल स्थानिकांमधे अधिक रूची पहिल्यांदा निर्माण झाली ती एका घटनेतून ज्यात इथे रखवाली करणाराच गायब होऊन बसला होता. या जंगलातून अधूनमधून बरेच चित्रविचित्र आवाज कानांवर आल्याचा दावा पर्यटकही करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार इथे एखाद्या अज्ञात उर्जेचा प्रभाव असू शकतो.
या जंगलाची खुबी बऱ्याच पर्यटकांनी ही अनुभवली की त्यांनी आत प्रवेश केल्यापासून ते बाहेर येईपर्यंत “काळ” म्हणजे थोडक्यात वेळ थांबलेली अनुभवली आहे. इथे काळ हा काही ठराविक मंद गतीत पुढे सरकत राहतो; असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. याला इंग्रजीत इंटर डायमेन्शनल् असाही शब्दप्रयोग केला जातो. तर ही अशी “होया बसयू” या जंगलाची रहस्यमय कहाणी आहे. जी आजवर माणसाला कोड्यात नक्कीच टाकून जाते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.