मित्रांनो! या जगातील प्रत्येक माणसाचे स्वप्नं असते… स्वतःचे हक्काचे घर. जिथून त्याला कधीही, कुणीही उठ म्हणणार नाही. दिवसभर राबल्यानंतर हक्काच्या विश्रांतीसाठी हवा असतो तो निवारा. परंतु घर म्हणजे नुसते दगड विटांचे बांधकाम नसून, त्यात हवीत आपल्या जिव्हाळ्याची माणसे, सुख, समाधान आणि समृद्धी आणि यासाठीच असते वास्तुशास्त्र. आणि हेच वास्तुशास्त्र घरात घोड्यांचे चित्रं लावण्याविषयी काही नियम सांगते, ते असे.
वास्तुशास्त्राच्या मते, भिंतीवर सात पांढऱ्या घोड्यांचे चित्र लावल्यास समृद्धी येते. परंतु ते लावताना, दिशाची काळजी घेणे आवश्यक आहे. घोड्यांची छायाचित्रे घरी आणि कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही स्थानी आपण लाऊ शकतो. सात अंक देखील खूप शुभ मानला जातो, कारण सात फेरे, सात ऋषी, इंद्र धनुष्या मध्ये देखील सात रंग असतात.
कधीच एकटा असलेल्या घोड्याचे चित्र घरामध्ये लावू नये, हे नुकसानदायी असते.धावणारा घोडा हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते, धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने आपल्या कामात प्रगती होते, तसेच व्यापारातही फायदा मिळतो. कामाच्या ठिकाणी घोड्यांची छायाचित्रे लावताना लक्षात घ्यावे की त्या छायाचित्रातील घोड्यांची तोंड आत वळलेली असावी. कामाच्या ठिकाणी दक्षिण दिशेला छायाचित्र लावावे किंवा आपल्या कार्यालयाच्या रचनेनुसार एखादया वास्तु तज्ञाच्या सल्ल्यानुसार फोटो लावावा.
जो व्यक्ती दररोज धावत असलेल्या त्या घोड्यांचे चित्र बघतो, त्या व्यक्तीच्या कामाच्या क्षमतेवर चांगला परिणाम होतो आणि त्याच्या कामाला गती येते. घोड्यांना समृद्धी आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते. ज्या छायाचित्रांमध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला धावत असतील तर ते छायाचित्र लावू नये, चित्र नेहमीच स्वच्छ असले पाहिजे आणि त्यावर धूळ नसावी. किंवा ते छायाचित्र फाटलेले किंवा तुटलेले नसावे.
जर घोड्यांचे चित्र घरात ठेवायचे असेल तर ते पूर्वेकडील दिशेला ठेवावे. यामुळे घरात धन धान्याची कमतरता भासत नाही. आई लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास्तव्य करते. आपण आपल्या घराच्या डिझाइननुसार वास्तु तज्ञाचा सल्ला घेऊन देखील फोटो लावू शकतो. घोड्यांची छायाचित्रे लावताना हे लक्षात ठेवा की छायाचित्रातील घोडे हे आनंदी असले पाहिजेत, त्यांना राग आलेला नसावा. किंवा घोडे रथ ओढत नसावेत.
पांढरे घोडे उर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात, ज्या घरात सात घोड्यांचे चित्र ठेवले गेले आहे, तेथे पैशाच्या बाबतीत कमी उतार-चढ़ाव येतात. तुमच्या वास्तुनुसार धावणाऱ्या घोड्याचे चित्र दक्षिणेकडील दिशेला लावावा जेणेकरून घोड्याचे तोंड घराच्या आत किंवा कार्यालयाच्या आतील बाजूस येते.
घोड्याचे चित्र लावण्याचे फायदे – वास्तुशास्त्रानुसार घोडा हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे घरातील घोड्याचे चित्र जर नेहमी तुमच्या दृष्टीस पडले तर मानसिक रित्या तुमची कार्यशैली वाढण्यास मदत होते. पांढऱ्या रंगाचा घोडा हा वास्तुशास्त्रानुसार उर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, म्हणून घरी किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोडाचे चित्र लावा.
संगणकाच्या वॉलपेपरवर घोड्याचे चित्र ठेवा, त्याचा तुमच्या कार्यावर परिणाम होईल आणि तुमची मानसिक ऊर्जा वाढेल. जर आपण कर्जामुळे त्रस्त असाल तर मग घर किंवा ऑफिसमध्ये एक मूर्तिस्वरूप किंवा शोपीस घोडा वायव्य दिशेला ठेवा, जो बाजारात सहज सापडेल. यामुळे आपल्याला प्रगतीच्या संधी मिळून लवकरच कर्जापासून मुक्तता मिळेल आणि नोकरी-व्यवसाय यामध्ये यश वाढेल.
टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !