ढोलकीच्या तालावरमध्ये आकाश ठोसरसोबत FU ची टीम ! आकाश आणि लावणीचं झिंगाट नातं उलघडणार ढोलकीच्या मंचावर
ढोलकीच्या तालावर या कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या कार्यक्रमातील छोट्या अप्सरा आपल्या नृत्यकौशल्याने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. मागच्या आठवड्यात दिपाली नायगावकर आणि सिद्धी तांबे यांनी मानाचा फेटा पटकावला आणि त्यांना फ्लश मॉब करण्याची सुवर्णसंधी मिळाली. या दोघींनी Fantastic म्हणतोय मला या गाण्यावर R – City mall मध्ये प्रेक्षकांमध्ये लावणी सादर केली जी प्रेक्षकांना येत्या आठवड्यात म्हणजेच २९ तारखेला बघायला मिळणार आहे. दोन आठवड्यामध्येच कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाची लोकप्रियता लक्षात घेता आपल्या पहिल्या चित्रपटाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आकाश ठोसर आपल्या नवीन चित्रपटाच्या म्हणजेच FU – Friendship Unlimited याच्या प्रमोशनसाठी टीमसोबत म्हणजेच सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे आणि शुभम ढोलकीच्या तालावरच्या सेटवर आले. हा विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे २९ आणि ३० मे रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
ढोलकीच्या तालावर कार्यक्रमातील स्पर्धकांना एक सरप्राईज मिळाले आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला स्वत:च्या प्रेमात पाडले म्हणजेच आकाश ठोसर आपल्या FU – Friendship Unlimited याच्या प्रमोशनसाठी ढोलकीच्या तालावरच्या मंच्यावर आले आणि सगळ्यांची मने जिंकली. या भागामध्ये छोट्या आणि मोठ्या अप्सरांनी एक से बडकर एक नृत्य सादर केली. समृद्धी आणि धनिष्ठाने वाजले की बारा या गाण्यावर लावणी सादर केली, त्यांनी या लावणीचे सादरीकरण कॉमिक प्रकारे केले त्यामुळे सगळ्यांच आश्चर्य वाटले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवानेच केले असल्यामुळे तिने या सादरीकरणाला विशेष पसंती दर्शवली. धनश्री आणि अनुष्काने क्रंप डान्स स्टाईलचा वापर करून लई कसाची या गाण्यावर लावणी सादर केली. या लोकप्रिय लावण्या स्पर्धकांना एका वेगळ्याच प्रकारे सादर केल्यामुळे त्यांनी परीक्षक तसेच या भागानिमित्त आलेले विशेष पाहुणे या सगळ्यांचीच मने जिंकली. लहान समृद्धीने उगवली शुक्राची चांदणी या गाण्यावर नृत्य सादर केले. तिची लावणी आकाश ठोसरला इतकी आवडली की त्याने तिला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. आकाश ठोसरने अनेक गंमती – जंमती, आठवणी यावेळेस प्रेक्षकांना सांगितल्या. लावणी हा असा नृत्यप्रकार आहे जो कोणाला बघायला आवडत नाही असे नाही. याचसंदर्भात बोलत असताना आकाश म्हणाला, ‘मी पेहलवान असताना लावण्या चोरून बघायचो”.
कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा आकाशसोबत शकुताईंनी, छोट्या अप्सरांनी एकत्र येऊन झिंगाट गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुषांनी म्हणजेच सत्या, शुभम, मयुरेश, जितेंद्र, हेमंत आणि आकाशने सगळ्या लहान मुलींना पाठीवर घेऊन जोरबैठका मारल्या ज्यामध्ये आकाश ठोसर विजेता ठरला. अश्याप्रकारे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये FUच्या टीमने आणि स्पर्धकांनी तसेच परीक्षकांनी खूप धम्माल केली.
येत्या आठवड्यात ढोलकीच्या तालावर कार्यक्रमामध्ये मानाचा फेटा मीनाक्षी आणि पलक यांनी पटकवला आहे. या जोडीचा फ्लश मॉब पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना २९ मेला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर २९ आणि ३० मे तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.