१९३३ मधे जन्मलेल्या आशा भोसले यांनी १९४३ म्हणजेच वयाच्या १० व्या वर्षांपासून आपल्या गायन कारकिर्दीची सुरूवात केली आणि तेव्हापासून आजतागायत त्या सतत गात आहेत. १९४८ च्या चुनारिया या चित्रपटातुन “हिंदी” चित्रपटात गाणे सुरू केले. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘सावन आया’ हे गाणे गायले.
आशाजींनी एक हजाराहून अधिक चित्रपटांत गाणी गायली आहेत असे म्हणतात. सन २००६ मध्ये आशजींनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी १२ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. गिनीज बुकानुसार त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.
आशा भोसले यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आशा भोसले यांनी ‘माई’ चित्रपटात काम देखील केले आहे. त्यांच्या या अभिनयाबद्दल त्यांचे कौतुकही झाले.
आशा भोसलेच्या प्रारंभीच्या काळात गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यासारख्या मोठ्या नावांनी गाण्याच्या जगावर अधिराज्य गाजवले. अशा परिस्थितीत आशा ताई कडे या सर्व दिग्गज गायिकांनी सोडलेली गाणी असायची.
सुरुवातीच्या काळात आशा बी ग्रेड म्हणजेच द्वितीय श्रेणीतील चित्रपटांची गायिका मानली जात असे. केवळ व्हँपवर किंवा सह-कलाकारांवर चित्रित केलेली गाणी आशा गायला मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षी आशा ताईचे ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न झाले. गणपतराव भोसले हे लता मंगेशकरांचे वैयक्तिक सचिव होते.
लतासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय या लग्नाच्या वि’रो’धा’त होते, परंतु आशाने ऐकले नाही. तिने प’ळू’न जाऊन लग्न केले. यामुळे लता आणि आशा यांच्यातील नात्यातील दु’रा’वा खूपच वाढला होता आणि दोघींची बोलाचाली बरीच वर्षांपासून बं’द होती. आशा ताईंना गणपतराव यांच्यापासून तीन मुले झाली. गणपतरावांच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हते.
तिथे त्यांना कायमच सासुरवास झाला. तिसऱ्या मुलाच्या वेळी प्रे’ग्न’न्ट असतांना गणपतरावांनी आणि त्यांच्या घरच्यांनी मारहाण करुन आशाजींना घराबाहेर हा’क’लू’न दिले. थोरल्या मुलाचे नाव हेमंत असून तो पायलट होता. नंतर संगीत दिग्दर्शक म्हणून हेमंत यांनी काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वर्तमानपत्रांसाठी लिहायची.
तरुण मुलगा आनंदने व्यवसाय आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला असून तो आशाजींच्या गायन कार्यक्रमांचे संयोजनही सांभाळतो आहे. आशा ताईची मुलगी वर्षा हिने वयाच्या ५६ व्या वर्षी २०१२ मध्ये आ’त्म’ह’त्या केली. आशाजींनी ६ वर्षांनी लहान असलेल्या दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मनबरोबर दुसरे लग्न केले. आरडीचेही हे दुसरे लग्न होते.
आशा भोसले या गाण्याव्यतिरिक्त स्वयंपाक करण्यातही माहिर आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे बऱ्याचदा आशा ताईंकडून कढई गोस्त आणि मटण बिर्याणीची फर्माईश करतात. आशाताईंनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, गायनातील त्यांची कारकीर्द बहरली नसती तर त्या शेफ झाल्या असत्या. आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय प्रचंड विस्तारलेला आहे.
दुबई आणि कुवेत मधील “आशा’ज” नावाची सुप्रसिद्ध रेस्टॉरंट्स आहेत. पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्य तेथे खवैय्यांच्या चवीसाठी उपलब्ध आहेत. या शिवाय अबू धाबी, दोहा, बहरेन येथेही त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. या रेस्टॉरंटच्या मेन्यू, टेस्ट, आणि अंतर्गत सजावटीमध्ये आशा ताईंचा खूप मोठा सहभाग आहे.
त्यांनी स्वतः जवळजवळ ६ महिने त्यांचा हॉटेल मधील शेफला प्रशिक्षण दिलेय. ‘रसेल स्कॉट’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुकने ब्रिटनसाठी आशा’ज या हॉटेल ब्रँडचे हक्क विकत घेतले आहेत. त्यांच्या योजनेनुसार आशा’ज नावाची ४० रेस्टॉरंट्स येत्या काही वर्षात तिकडे सुरू केली जातील.
आशा लहानपणी कायम त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या सोबतच राहायची. लता आशाला शाळेत, शिकवणीलाही घेऊन जायची. एके दिवशी जेव्हा शिक्षकाने एकाच फी मध्ये दोघींना शिकविण्यास नकार दिला तेंव्हा लताने शिक्षण सोडून दिले. ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ हे गाणे ब्रिटनच्या अल्टरनेटिव्ह रॉक बँड ने १९९७ मध्ये प्रसिद्ध केले होते. आशा भोसले यांना समर्पित हे गाणे प्रचंड आंतरराष्ट्रीय हिट ठरले होते.
आशाजी १८ वेळा फिल्मफेअरसाठी नामांकित झाल्या आहेत. त्यांनी तो ७ वेळा जिंकलाही आहे. सन १९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाजींनी नवीन प्रतिभेला संधी मिळायला हवी, असे सांगून या पुरस्कारासाठी नामांकन करण्यास नकार दिला. २००१ मध्ये आशाजींना फिल्मफेअरचा लाइफटाइम पुरस्कार देण्यात आला. अदनान सामी जेव्हा दहा वर्षांचा होता तेव्हा आशा ताईंनी त्यांना गायन क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला होता.
आशा भोसले एक उत्तम गायिका असूनही एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहेत. त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करतात. आशा भोसले यांनी सुरुवातीस ‘आजा आजा, मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यास नकार दिला होता. कारण त्यांना वेस्टर्न स्टाईल गाणे कठीण जात होते. पण नंतर या आणि अशाच कित्येक वेस्टर्न गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डो’क्या’व’र घेतले. आशा भोसले या उस्ताद अली अकबर खान यांच्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या पहिल्या गायिका ठरल्या होत्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.