माणसाच्या शरीरातील प्रत्येक अवयव अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला असलेल्या चुकीच्या सवयी कधी मोठ्या आजारांना आमंत्रण देतात तर कधी त्यासाठी आयुष्यभराची किंमत मोजावी लागते. तुम्हाला ही जर ‘ह्या’ सवयी असतील तर आजच सोडा नाहीतर आयुष्यभरासाठी गमवावी लागेल किडनी.

लघवी रोखणे : लघवीला बराच काळ रोखून ठेवल्यास बॅ’क्टे’रि’या वाढण्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा म्हणजे युरिनरी ट्रॅक इ’न्फे’क्श’न’चा देखील त्रास होतो. याव्यतिरिक्त, यामुळे किडनीस्टोन सारख्या किडनीच्या आजाराचा धो’का वाढू शकतो आणि क्वचित प्रसंगी मूत्राशय फुटण्याचा धो’का देखील संभवू शकतो.

पुरेसे पाणी पिणे : भरपूर पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते त्यामुळे किडनीला शरीरातून सोडियम आणि इतर विषारी पदार्थ साफ करण्यास मदत होते. दररोज 1.5 ते 2 लिटर पाणी पिणे निरोगी शरीरासाठी महत्वाचे आहे.

पेनकिलर औषधांचा अतिवापर : एनएसएआयडीएस (नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स) या सारख्या काउंटर पेनकिलर औषधांमुळे वेदना कमी होऊ शकतात परंतु ते किडनीस हा’नी पोहोचवू शकतात, खासकरून जर तुम्हाला आधीच असा कुठला आजार असेल तर.

दा’रूचे अतिसेवन : अति दा’रू पिल्याने तीव्र किडनीच्या आजारांचा धो’का दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. अति म’द्य’पा’न करणाऱ्या लोकांना किडनीचा त्रास होण्याचा धो’का इतर लोकांपेक्षा पाचपटीने जास्त असतो. अति दा’रूने कि’ड’नी र’क्त शुद्ध करण्याचे काम नीट करू शकत नाही. ह्यासोबतच लिव्हर खराब होण्याचादेखील धो’का मोठ्या प्रमाणात असतो.

अति साखर : साखर लठ्ठपणास कारणीभूत ठरते ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह होण्याचा धो’का वाढतो, किडनीच्या आजाराची ही दोन प्रमुख कारणे आहेत.

अति मांसाहार : अ‍ॅनिमल प्रोटीनमुळे रक्तामध्ये उच्च प्रमाणात अ‍ॅसिड तयार होते जे किडनीसाठी हानिकारक असू शकते आणि अ‍ॅसिडिटी वाढते. शरीराच्या सर्व भागाची वाढ, देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रोटिन्स आवश्यक असतात परंतु फळ आणि भाज्यांसह आपला आहार योग्य प्रमाणात संतुलित असावा.

अपुरी झोप : रात्रीची झोप संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते. स्लीप-वेक सायकलद्वारे किडनीचे कार्य नियमित केले जाते.

जर तुम्हाला डॉक्टरांकडून पोटॅशियम किंवा फॉस्फरस मर्यादित ठेवण्यास सांगितले गेले असेल किंवा डायलिसिसवर असाल तर तुमच्या आहारातील गरजाविषयी आहारतज्ञ किंवा नेफरोलॉजिस्टशी जरूर चर्चा करा.