“चौर्य” चित्रपटाचे संगीत प्रकाशन निराळ्या पध्दतीने संपन्न

Chaurya Marathi Movie Poster

  • Movie : Chaurya (2016) | ( चौर्य )
  • Producer : Nilesh Navalakha, Vivek Kajaria, Sameer Asha Patil & Ashwini Patil..
  • Directer : Sameer Asha Patil
  • Star Cast : Kishor Kadam, Milind Shinde, Ganesh Yadav, Pradeep Velankar, Digvijay Rohidas, Dinesh Lata

 

Chaurya (2016) Marathi Movie Song Free Download

 

 

समीर आशा पाटील या नवोदित तरुण दिग्दर्शकाचे दिग्दर्शन असलेला, नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांची निर्मिती असलेल्या, राजन आमले सहनिर्मिती “चौर्य” सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे श्रीमती. कमला मेहता अंधशाळा, दादर यांच्या संचालिका श्रीमती. सुपर्णा आजगावकर व त्याच शाळेतील काही अंध विद्यार्थिनींच्या हस्ते सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
शनी शिंगणापूर एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्‍याना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्‍या आणि रोमांचित करणार्‍या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयाभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
“मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच Accessibility Format चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आशय सहस्त्रबुद्धे या आमच्या मित्राने या विषयात पी. एच.डी. केली असून या चित्रपटासाठी सध्या तो यावर काम करीत आहे.आजवर हा प्रयोग बॉलिवूडमध्येदेखील झाला नसून “चौर्य” चित्रपटाच्या माध्यमातून हा पहिला मान मराठीसिनेसृष्टीला मिळणार असल्याने आम्हाला याचा नक्कीच सार्थ अभिमान आहे. अंध आणि कर्णबधीरांनादेखील ह्या अभिनव प्रयोगामुळे चित्रपटचा आनंद हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे घेता येईल”, असे निर्माते नीलेश नवलखा यांनी सांगितले.

Chaurya (2016) Marathi Movie Song Free Download

तर दिग्गर्शक समीर पाटील सांगतात, “चौर्य हा माझा पहिला चित्रपट आहे. नीलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये रस दाखविल्याने तसेच काही क्रिएटिव्ह गोष्टींच्या मार्गदर्शमुळे हा चित्रपट अधिकच रंजक झाला आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य की हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण हे राजस्थान येथील चंबळ येथे करण्यात आले आहे.”
“चौर्य चित्रपटाचे थीम सॉँग आम्ही पहिले तयार केले. त्यानंतर आम्ही चित्रपटातील तीन गाण्याकडे वळलो. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि गायिका उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून शंकरराव धामणीकर, विष्णू थोरे आणि समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत.चित्रपटातील तीनही गाणी ही वेगळ्या पठडीतील असून प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडतील अशी मला आशा आहे”, असे संगीतकार मयुरेश केळकर म्हणाले.
अभिनेते किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अशा या उत्कंठावर्धक “चौर्य” चित्रपटाचे मुखवट्यामागील रहस्य ५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात उलगडणार आहे.

 

chaurya marathi movie sons

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here