अजय देवगन यांचा ‘तान्हाजी द अनसंग वारीयर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती प्रचंड गल्ला जमवत आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिस वरती धुमाकूळ घालत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेचे वरती आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळ्याच्या पराक्रमाला उजळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या चित्रपटामुळे नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज देखील चर्चेत आले आहेत जाणून घेऊयात कोण आहेत त्यांचे वंशज आणि सध्या ते काय करत आहेत.

कोल्हापुरातील पारगड या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या 11 पिढ्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतरच्या वंशजांनी देखील किल्ल्याशी आपली नाळ तोडली नाही. आज-काल हे कुटुंब शिक्षण नोकरी-व्यवसायानिमित्त बेळगाव महाड आणि कोल्हापूर अशा ठिकाणी स्थायिक झालेले आहे.

त्यापैकी कै. शिवराज बाळकृष्ण मालुसरे हे तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज होते. 2012 मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी डॉक्टर शीतल मालुसरे, मुलगा रायबा, मुली अंकिता आणि देवयानी असा परिवार आहे. हा परिवार सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे स्थायिक झालेला आहे.

डॉक्टर शीतल मालुसरे यांनी तानाजी मालुसरे यांच्यावर पीएचडी केलेली आहे त्या महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्या अनेक ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरती व्याख्यान देतात. डॉक्टर शीतल मालुसरे यांनी सांगितले की पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी इसवी सन 1776 मध्ये पारगड येथे हा किल्ला बांधला गेला.

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर आणि त्यांच्या वीर मरणानंतर त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून घोषित केले.

कै. शिवराज मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचे केईएस या इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेले असून ते सध्या पुण्यामध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहेत. तर अंकिता या बीबीए चे शिक्षण घेत आहेत. देवयानी यांचेदेखील माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेले आहे त्या टीबीके कॉलेज भरणे खेड येथे बीएडचं शिक्षण घेत आहेत.

पारगडावर तानाजी मालुसरे यांच्यासह शेलार मामा यांचे वंशजहि आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी देखील आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती राहिले होते.

निसर्गाच्या कुशीत असलेला किल्ला आजही दिमाखात उभा आहे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक जतन करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.