तान्हाजी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वरती विक्रमी घोडदौड करत आहे. या चित्रपटाने जवळपास पावणे दोनशे कोटींचा विक्रमी टप्पा गाठला आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन याने नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेता सैफ अली खान याने उदय भान याची भूमिका साकारली आहे.

जेव्हा सामान्य माणूस चित्रपट पाहतो तेव्हा चित्रपट प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून जात आहे. तरीही, या चित्रपटातील दोन बाबी मात्र अनुत्तरीतच राहिलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या दोन बाबी? जाणून घेऊयात….

सिने रसिकांनी डोक्यावर उचलुन धरलेला “तान्हाजी” चित्रपट सध्या महाराष्ट्रासोबतच देशामध्ये धुमाकूळ घालत आहे. ॲक्शन हिरो अजय देवगन आणि सैफ अली खान यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कुठेही उणीव ठेवलेली नाही. या दोघांनीही अत्यंत ताकतीने काम केल आहे.

हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील कोंढाणा किल्ल्यावरील ही लढाई खूपच महत्त्वाची आहे. मोजक्या मावळ्यांच्या सह्याने नरवीर तानाजी मालुसरे यांनी ही लढाई जिंकली होती. या लढाईचे जबरदस्त सादरीकरण या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळते. मात्र, या चित्रपटामध्ये दोन पात्र दाखविण्यात आली आहेत.

जी पात्र सुरुवातीला तर तुम्हाला दिसतात परंतु नंतर त्या पात्रांचा साधा उल्लेख देखील चित्रपटांमध्ये बघायला भेटत नाही. चित्रपट संपल्यानंतर त्या पात्रांचं काय झालं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. चंद्राजी पिसाळ आणि कमल ही दोन अशी पात्र आहेत ज्यांचा पुढे उल्लेख देखील सापडत नाही‌.

चंद्राजी पिसाळ कुठे गायब झाले?

या चित्रपटामध्ये चंद्राजी पिसाळ यांची भूमिका मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव यांनी केलेली आहे. चित्रपटाच्या कथेत चंद्राजी पिसाळ हा गद्दार मराठा सरदार म्हणून दाखविण्यात आला आहे. तानाजी मालुसरे चढाई करणार ही खबर उदयभान पर्यंत पोहोचवण्याचे काम चंद्राची पिसाळ करतात. यापैकी जो ही खबर पोहचवतो त्याला गद्दारीची शिक्षा मिळते. मात्र, चंद्राजी पिसाळ यांचे पुढे काय झाले हे मात्र या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेले नाही.

कमल कुठे गेली?

उदयभानच कमलवरती जीवापाड प्रेम असल्याचं या चित्रपटाच्या कथानकात दाखवलेला आहे. एरव्ही कुणाचीही दयामाया न करणारा उदयभान कमल च्या बाबतीत मात्र फारच हळवा दाखविण्यात आलेला आहे. कमलच्या पतीच्या मृत्यूनंतर उदयभान तिचे अपहरण करतो. तो तिच्या होकारासाठी कितीही प्रतीक्षा करायला तयार असतो.

कमलचा भाऊ देखील उदयभानाच्या सैन्यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. त्याला काहीही करून आपल्या बहिणीची उदयभानचा तावडीतून सुटका करायची आहे आणि अशा परिस्थितीत तानाजी मालुसरे त्यांना एक आशेचा किरण वाटतात. पुढे कोंढाण्याची लढाई पूर्ण होते मराठे या तुंबळ युद्धामध्ये विजयी होतात. मात्र, कमल आणि तिच्या भावाचा पुढे कुठेही उल्लेख केलेला नाही. चित्रपटाचा शेवट थोडा घाईतच उरकला आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.