पुन्हा एकदा नव्या उत्साहात, नव्या उर्जेत एक नवी उमेद घेऊन कलर्स मराठी सज्ज आहे रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहूरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून विविध रंगाची उधळण करण्यासाठी. प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”. या कुटुंबाला साथ लाभली ती आपणासारख्या मायबाप प्रेक्षकांची ज्यांनी कार्यक्रमांवर भरभरून प्रेम केले आणि अजूनही करत आहात. आता हेच ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे… इतक्या महिन्यांनंतर होणारी आपली भेट जल्लोषात साजारी करण्यासाठी घरातील लाडक्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत घरातूनच साकारलेला अभूतपूर्व सोहळा “नवी उमेद नवी भरारी” हा विशेष कार्यक्रम २६जुलै संध्या ७.वा आपल्या कलर्स मराठीवर. मनोरजंन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा सहभाग सोहळ्यामध्ये असणार आहे. हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते कार्यकमाचे सूत्रसंचालन करणार म्हणजेच गाण्यांसोबत धमाल – मस्ती, गप्पा तर होणारच…हा सोहळा अजून खास होणार जेंव्हा कलर्स मराठी परिवाराचे नवे आणि काही जुने सदस्य आपल्या भेटीला येणार… या आनंदामध्ये भर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उध्दवजी ठाकरे यांनी कलर्स मराठी परिवाराला खास शुभेच्छा दिल्या. तर, मनोरंजन क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, आदेश बांदेकर, आणि कलर्स मराठी परिवाराशी खास नात असलेला आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी यांचादेखील सोहळ्यामध्ये सहभाग असणार आहे…
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील सुरवीरांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, त्यांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली… त्यातीलच काही सुरवीरांची सुरेल गाणी सादर होणार आहेत. ज्यांच्या सुरांनी सूर नवाचा मंच बहरून जायचा, ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर असायचा असे महेश काळे यांचे गाणे पुन्हाएकदा ऐकण्याची सुवर्णसंधी आपल्याला या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. आपल्या लाडक्या मॉनिटरची म्हणजेच हर्षद नायबळची देखील धम्मकेदार एन्ट्री होणार आहे. हर्षदचे धूआदार गाणे आणि एकूणच त्याच्या हजरजबाबीपणा याने अवघ्या महाराष्ट्राचे मन तो पुन्हाएकदा जिंकणार यात शंका नाही… लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरीत्या सांभाळणारा आजचा आघाडीचा प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याचे देखील गाण सादर होणार आहे … तर अवधूत गुप्ते आपल्या सगळ्यांचा लाडका सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे… ज्येष्ठ अभिनेते, गायक, दिग्दर्शक, निर्माते, सचिन पिळगांवकर यांचा परफॉर्मन्स देखील बघायला मिळाणार आहे… तर, स्पृहा जोशी सुंदर कविता सादर करणार आहे … या सगळ्या कलाकारांसोबत रंगलेला अभूतपूर्व सोहळा नक्की बघा कलर्स मराठीवर.
मालिकांतील व्यक्तिरेखांशी रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहूना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. या सोहळ्याची रंगत अजूनच वाढेल जेंव्हा कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकार त्यांचे काही खास परफॉर्मन्स सादर करतील… सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कार्यक्रमामधील अॅक्ट शूट करणे अनिवार्य होते आणि त्यामुळेच या कार्यक्रमामधील परफॉर्मन्समध्ये नक्कीच वेगळेपण दिसून येईल. आता ती गमंत काय असेल आणि कशाप्रकारे शूट केले असेल हे तुम्हाला कळेलच.
आपल्यावर ओढावलेल्या या संकटाचा आपण सगळेच मोठ्या ध्येर्याने सामना करत आहोत आणि त्यावर मात करण्याचा पुर्णपणे प्रयत्न देखील करत आहोत.. या संकटाशी झुंज देत जे बाहेर पडले अशा काही वॉरीयर्सचा प्रवास आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत… याचसोबत अवधूत गुप्ते मनोरंजन क्षेत्रातील काही मंडळींशी संवाद देखील साधणार आहे. ही मंडळी कोण असतील, त्यांच्याशी काय गप्पा रंगणार हे तुम्हाला कार्यक्रमाध्ये बघायला मिळेल.
तीन महिन्याच्या या दुराव्यानंतर आपलं नात पुन्हा एकदा नव्याने बहरणार…तेंव्हा सज्ज होऊया नात्याच्या नव्या रंगात रंगून जाण्यासाठी… मनोरंजनाच्या या नव्या आरंभामध्ये आपण सगळे सहभागी होऊया नक्की बघा “नवी उमेद नवी भरारी” २६ जुलै संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.