प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. कुणीमित्र-मैत्रीणीच्या साहाय्याने आपलं प्रेम प्रेयसीपर्यंत पोहोचवू पाहतो तर कुणी चिट्ठी, ब्लँक कॉल्स या आणि यांसारख्या अनेक युक्त्या लढवल्या जातात. प्रेमात आणि युद्धात सारंकाही माफ असतं म्हणतात, त्याला अनुसरूनच चेतन गरुड प्रोडक्शन्सदचं आणखी एक रोमँटिक सॉंग होळीच्या रंगातन्हाऊन निघालंय. ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ असे आपल्या मातीशी एकरूप करणाऱ्या बोली भाषेतलं हेगाणं एका लहान निरागस मुलाच्या मदतीने प्रेमीवीरांची लव्हस्टोरी उलगडून दाखवण्यास मदत करतो.
चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि टाइम्स म्युझिक मराठी यांच्यासंयुक्तविद्यमाने ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ यागाण्याची निर्मिती करण्यात आली असून सुप्रसिद्ध गायक वैभव लोंढे आणि चेतन गरुड यांची केमिस्ट्री पुन्हा एकदाजुळून आली आहे. सुनील वाहूळ यांनी लिहिलेलय व संगीत दिलेल्या या गाण्यातील नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांनाही प्रेमात पडेल अशीच आहे. निशाणी बोरुळे आणि अक्षय जयेंद्रकेळकर यांच्यासोबतच विनीत शेट्टी, सुरज अलंकार आणि चैताली पाटील यांचाही या गाण्यात सहभाग आहे.
मंचरजवळील चपाटेवाडी येथील सुंदर लोकेशन्सवर खुलणारी ही प्रेम कहाणी दिग्दर्शन शुभम भुजबळ यांचं आहे तर उत्तम सिनेमॅटोग्राफी कमलेश शिंदे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजेया गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आलाआहे. ज्यामुळे निसर्गसौंदर्य आणखी खुलून आलं आहे असाम्हणतात येईल आणि तत्याचं श्रेय गोपाळ शिंदे याना जातं. राहुल झेंडे संकलक, वेष-केशभूषा प्रतीक्षा काकडे आणि तिशा मेश्राम आणि निर्मिती प्रमुख आदित्यराजे मराठे अशी इतर श्रेयनामावली आहे.
होळी आणि रंगपंचमीचे औचित्य साधत ‘आधी होतं कडूआत्ता ग्वाड व्हाया लागलं’ या गाण्याचा सध्या टाइम्स म्युझिकमराठी चॅनेलवर तुम्ही आस्वाद घेऊ शकता.