‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’अभियानातून शेतकऱ्यांच्या व्यवसायाला वृद्धी. ट्रॅक्टर व शेतीच्या यांत्रिक साहित्यासाठी मिळू शकते अनुदान, जाणून घ्या कसं ?
शेतकरी शेतीत राब–राब राबतो, चांगल्या प्रतीचे उत्पन्न काढण्याचा प्रयत्न असतो, पण कधी योग्य वेळी ट्रॅक्टर व शेतीच्या यांत्रिक साहित्यासाठी मिळू शकते अनुदान, जाणून घ्या कसं ?
शेतकरी शेतीत राब-राब राबतो, चांगल्या प्रतीचे उत्पन्न काढण्याचा प्रयत्न असतो, पण कधी योग्य वेळी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने, तर कधी मजूर वेळेवर मिळत नसल्याने, त्याला भरमसाठ नुकसानीस सामोरे जावे लागत होते. पण ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेतीच्या यांत्रिक साहित्यासाठी अनुदान मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असणारे दापुर हे गाव, या गावात रमेश आव्हाड यांची अडीच एकर शेती आहे. या शेतीत डाळींबाच्या बागेसोबत टमाटे, कांदे अशी सिझनल पिके ते घेतात. पाऊस कमी असल्याने त्यांनी ठिबकची सुविधा करून घेतली आहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतीची कामे वेगाने करण्याची गरज होती. शेतीच्या कामासाठी वर्षाला 20 हजार रुपये मजूरी लागायची आणि वेळेवर मजूरदेखील मिळायचे नाहीत.
यावर काय तोडगा काढता येईल या विचारात असतांनाच आव्हाड यांना “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी” या अभियानाविषयी कृषी सहाय्यक दादासाहेब जोशी यांच्याकडून माहिती मिळाली. आपणही शेतीला पूरक
असे यंत्र घेऊयात हा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. यासंदर्भात सगळी माहिती व सहकार्य आव्हाडांनी कृषी सहाय्यक जोशी यांच्याकडून घेतले. ट्रॅक्टरसाठी अभियानातून त्यांना १ लाख 25 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. इतर खर्च शेतीतील उत्पन्नातून करत 42 हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केले. ट्रॅक्टरमुळे रोटोव्हेटरचा चांगला वापर होत असून इतर कामेही वेगाने होत आहेत.
‘शेतमाल तयार झाल्यावर बाजारात पटकन नेता येतो. ‘आपला शेतमाल अन् आपली वाहतूक’, यामुळे खर्चही वाचतो आणि कामही पटकन होते. मजूरी आणि शेतमाल बाजारात नेण्याचा खर्च मिळून तीस ते चाळीस हजार रुपयांची बचत होत आहे. गुणवत्तापूर्ण शेती करणे ट्रॅक्टरमुळे शक्य झाल्याचे आव्हाड सांगतात. त्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदा चाळीसाठी देखील 87 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे.
शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी यांत्रिकीकरण महत्वाचे आहे. “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी” अभियानातून हेच साध्य करण्याचे प्रयत्न आहे. त्याला येणारे यश रमेश आव्हाड यांच्या शेताला भेट दिल्यावर लक्षात येते.