बॉईजच्या सक्सेसची म्युजीकल ट्रीट
‘बॉईज’ सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा
विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या सिनेमाचा ‘नॉइज’ संपूर्ण महाराष्ट्रात दुमदूमत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित, या सिनेमाला तरुणवर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाखातर, ‘बॉईज’ च्या टीमने खास आपल्या प्रेक्षकांसाठी ‘लंपटझंपट’ ची म्युजीकल ट्रीट देऊ केली आहे. शिवाय याच पार्टीत २०१९ ला बॉईज सिनेमाचा सिक्वेल घेऊन येणार असल्याची अधिकृत घोषणा देखील निर्मात्यांनी केली. लोअर परळ येथे दिमाखात झालेल्या या सिनेमाच्या सस्केस पार्टीमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांना आकर्षक सन्मानचिन्ह देत पुरस्कृत करण्यात आले, शिवाय फेसबुक लकी विनर ठरलेल्या विजेत्या स्पर्धकाला ई सायकलदेखील देण्यात आली.
खट्याळ ‘बॉईज’ वर्गाची धम्माल आणि मस्तीत रंगलेला हा सिनेमा, प्रसिद्धीचा उच्चांक गाठत असल्यामुळे, खास प्रेक्षकांसाठी सादर केलेले ‘लंपटझंपट’ हे गाणं, सिनेमा रिलीज झाल्यानंतर चित्रित करण्यात आले असून, सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यालादेखील प्रेक्षक पसंत करीत आहे. ‘लंपटझंपट’ या उडत्या लयीच्या गाण्याला दिग्विजय जोशी यांचा आवाज लाभला असून, मंगेश कांगणे लिखित हे गाणे अवधूत गुप्ते यांच्या संगीतदिग्दर्शकीय नजरेतून साकार झाले आहे. मराठीची बाॅल्ड आणि ग्लॅमरर्स अभिनेत्री स्मिता गोंडकरचा नखरेल अंदाज यात पाहायला मिळतो.
या सिनेमाविषयी सांगताना प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते भाऊक होतात. ”बॉईज’ सिनेमाला सिनेरसिकांचे अमाप प्रेम मिळत असून, आमच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना ‘लंपटझंपट’ या गाण्याद्वारे आम्ही रिटर्न गिफ्ट देत आहोत. आमचे हे गिफ्ट प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो’ असे अवधूत गुप्रे यांनी सांगितले,.
संजय जाधव, अंकुश चौधरी, अमितराज, संचित पाटील, आनंद इंगळे तसेच वैशाली सामंत, रीना अगरवाल या सिनेतारकांची मांदियाळीदेखील या पार्टीतील आकर्षणाचा विषय ठरला . शिवाय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले अभिनेते सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा येत्या दोन दिवसात १० करोडचा आकडा पार करेल, अशी भविष्यवाणी करत सिनेमाला भरघोस शुभेच्छा दिल्या. सध्या या सिनेमाचे दोन आठवड्यांचे कलेक्शन पाहिले असता, मराठी प्रेक्षकवर्ग मोठ्याप्रमाणात या चित्रपटाकडे वळत असल्याचे लक्षात येईल. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात ३०० वरून ३५० थिएटर्स आणि २८०० शोजवरून ४००० शोजवर बाजी मारली असून, ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून ते रविवार दि. १७ सप्टेंबरपर्यत ‘बॉईज’ सिनेमाने ८ करोड ४० हजार चा गल्ला कमावला आहे.
शिवाय या सिनेमाची वाढती मागणी लक्षात घेता अनेक थिएटर मालक या सिनेमासाठी अधिक वेळ देण्याची तजवीज करताना दिसून येत आहेत. तीन मित्राची न्यारी दुनिया आणि त्यांच्या विनोदाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, वैभव मांगले, शिल्पा तुळसकर, शर्वरी जेमिनेस, रितिका शोत्री यांच्यादेखील भूमिका आहेत. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणा-या मराठी सिनेमाच्या यादीत आग्रस्थानावर लवकरच कूच करणार आहे.
Boyz Marathi Movie Photos