सध्या सिनेसृष्टीत अनेक मनोरंजनात्मक गोष्टी आपल्याला रोज पहायला मिळतात. तर अशाचप्रकारची एक जबरदस्त वेबसिरीज सध्या आपल्यला पहायला मिळते आहे. ही वेबसिरीज म्हणजे, बाहुबली या सिनेमावर आधारित कथानकावर बनवल्या गेली आहे. भारतीय सिनेमाक्षेत्रात एक उच्चस्तरीय प्रकारचा दर्जा आणि किर्तीमान स्थापन केलेला सिनेमा म्हणजेच बाहुबली.
बाहुबलीच्या दोन भागात आलेल्या सिनेमाने अनेक प्रकारचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड अगदी सहजरित्या मो’डी’त काढले. बाहुबलीच्या सिनेमात दाखवण्यात आलेल्या एकूण एक दृश्याने रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून सोडलं होतं. एकूण एक नजारा जणू रसिकप्रेक्षकांनी अक्षरश: आपल्या मनात साठवून ठेवला आहे. नेटफ्लिक्स सध्या याच कथानकावर आधारित वेबसिरीज करत असल्याची माहिती मिळाली आहे.
या वेबसिरीजमधे अनेक चांगले कलाकार घेण्यात येणार आहेतच. शिवाय या वेबसिरीजचं चित्रिकरणदेखील सुरू झालं आहे. सध्याच्या घडीला या वेबसिरीजचं बरचसं चित्रीकरण पुर्ण झाल्याचीही माहिती मिळाली आहे. अंदाजे बाहुबली या वेबसिरीजची 70% शुटींग पूर्ण झाल्याची शक्यता आहे.
आणि इतक्या लांब पल्ल्यावर आल्यानंतर आता पुढे मृणाल ठाकूर ही अभिनेत्री पुढे चालून शिवगामीची भुमिका करणार होती. परंतु नुकतीच एक माहिती समोर आली आहे की, ज्यामधे मृणाल आता हे पात्र साकारू शकणार नसल्याची खबर मिळाली आहे. मृणाल ऐवजी सध्याच्या घडीला शिवगामी या पात्राची भुमिका कोण साकारणारं हा मोठा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर नुकतचं मिळालं आहे.
“बाहुबली – बेफोर द बिगिनींग” हे या वेबसिरीजचं नाव असणार आहे. या वेबसिरीजचं एकूण बजेट हे 200 कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. मुळात एवढ्या मोठ्या स्केलवर तयार होणारी ही पहिलीच भारतीय वेबसिरीज असू शकते.
खरतरं नेटफ्लिसने सुरूवातीला या वेबसिरीजकरता 100 कोटी रूपये दिले होते, परंतु त्यांना तिचं होऊ लागलेलं चित्रीकरण न आवडल्यानं त्यांनी पुन्हा 100 कोटी अधिक पैसे लावायचा निर्णय घेतला. जर बाहुबली या सिनेमाप्रमाणेच एखादी वेबसिरीज बनवायची असेल तर निश्चितच बाहुबलीसारखीच त्याच्या कामाची पुर्तताही झाली पाहिजे.
मृणाल ठाकूर सोडता आणखी इतरही काही कलाकार या वेबसिरीजमधून बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय मुळ म्हणजे शिवगामीची भुमिका आता पंजाबी अभिनेत्री वामिका गाबी ही साकारणार आहे. वामिकाने यापुर्वी “जब वी मेट”, “लव्ह आज कल”, “मौसम” यांसारख्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर झळकली होती.
मृणाल ठाकूर तिच्या इतर काही प्रोजेक्ट्समधे व्यस्त झाली असल्याने तिला हि सिरीज करण्यात अडथळा निर्माण होऊ लागला होता. 2021 सालच्या शेवटापर्यंत ही वेबसिरीज रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे म्हणाल तर वामिकाला इन्स्टाग्राम अकाउंटवर चांगलीच प्रसिद्धी आहे. तिच्या चाहत्यांसोबत ती नेहमीच संपर्कात राहत असल्याची पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!