आपल्याला सर्वांना माहितच आहे आहे की, बॉलिवूड सिनेसृष्टीतली एक उत्कृष्ठ अभिनेत्री असलेली दिया मिर्झा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली आहे. आणि मुळात आता लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यातच तिने तिच्या चाहत्यांना एक प्रचंड आनंदाची बातमी दिल्याचं आपल्या समोर आलं आहे.

खरतरं व्हॅलेंटाईन दिवसाच्या नेमक्या दुसऱ्या दिवशी तिचा विवाह पार पडला होता. दियाने नुकतीचं तिच्या गरोदरपणाची बातमी एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत दिली आहे. दियाने या पोस्टवर जबरदस्त शब्दांचा कॅप्शन देखील लिहलेला पहायला मिळतो. ही बातमी सर्वांना समजल्यानंतर अनेक सिनेअभिनेते व अभिनेत्र्या यांनी तिचं मनापासून अभिनंदन केल्याचं पहायला मिळतं आहे.

दियाचा नवरा वैभव रेखी हादेखील या बातमीने अगदीच हर्षोल्लाहित होऊन गेल्याचा पहायला मिळतो आहे. आजपासून अवघ्या दीड महिन्यांपूर्वी वैभव रेखी आणि दिया हे लग्नबंधनात अडकले. दियाने त्याच्याशी लग्न करण्याबाबतचा खुलासा फारच आधी केला होता. त्यावेळी सर्वांना हि बाब फार आश्चर्याची वाटली होती.

परंतु पुढे जेव्हा ही गोष्ट सत्यात उतरली तेव्हा लोकांचा विश्वास बसला. हैदराबाद या ठीकाणी दोघांच्याही लग्नसोहळ्याचा कार्यक्रम चांगल्या रितीने पार पडल्याचा पहायला मिळाला होता. दियाचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिने घटस्फो’ट घेतलेला आहे. दिया व तिचा पहिला नवरा दोघांनीही एकमेकांच्या सहनिर्णयाने हा घटस्फो’ट घेतला असल्याचही समजलं आहे. यानंतर दियाने तिच्या आयुष्यात एक नवी सुरूवात केलेली पहायला मिळते आहे.

दियाचं वैभव याच्यासोबत जे हैदराबाद येथे लग्न पार पडलं, त्या लग्नसमारंभातील दियाच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष अगदीच तिच्याकडे वेधून घेतल्याच पहायला मिळतं होतं. या लग्नाची खासियत अशी होती की, हे लग्न लावून द्यायला एक महिला पंडित तिथे उपस्थित होती. आणि एका महिला पंडिताने लग्न लावताना पाहणं, हा सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला होता. लाल रंगाच्या बनारसी साठीमधील दिया अगदीच जणू स्वर्गसुंदरी दिसत होती.

लग्नानंतर आपलं हनीमून दिया व तिचा नवरा मालदिव या ठिकाणी आरामात मनसोक्त आनंद घेत वेळ घालवत असताना पहायला मिळाले होते. मालदिवच्या बीचवर व इतर ठिकाणी दोघेही अगदी मजेत आनंदात जगत आहेत. दियाने सध्या जी गुड न्यूज दिली आहे, तो फोटोदेखील मालदिव येथील बीचवरचं शुट केलेला आहे.

दियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दियाचे अनेक चांगले सिनेमे आजवर रसिकप्रेक्षकांसमोर अधिराज्य गाजवताना पहायला मिळतातचं. शिवाय तिच्या “रेहना है तेरे दिल में” या सिनेमाची धुन आजही काहीशी वेगळीच पडलेली आहे, हे सर्वांना माहितच आहे. दियाबद्दल बोलायचं झालं तर दिया मिर्झाला 2000 सालचा मिस एशिया पॅसिफिक हा खिताब मिळाला होता.

दियाचे जे काही चांगले सिनेमे आजवर रसिकप्रेक्षकांवर बिंबून राहिले ते म्हणजे, दस, लगे रहो मुन्नाभाई, संजू, सलाम मुंबई, हम तुम और घोस्ट. याशिवाय दियाने काफीर या वेबसिरीजमधेही अगदी उत्तम भुमिका निभावल्याची पहायला मिळाली. टेलीव्हिजनवर चालणारी गंगा या मालिकेतूनही ती रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हैद्राबादमधे जन्मलेल्या दियाला अगदी सुरूवातीपासूनच सौंदर्याच वरदान लाभलेलं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!