बॉलीवुड असो हॉलीवुड असो वा इतर कोणतंही सिनेसृष्टीचं क्षेत्र. प्रत्येक ठिकाणी आजही सिनेअभिनेत्री जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात हजर होतात तेव्हा एकच चर्चा थोडी अधिक प्रभावीपणे रंगते आणि ती असते त्यांच्या आउटफिट्सबद्दलची. स्टाईल, सौंदर्य, ग्लॅम, पोशाखांची वेगळी सजावट करून त्याला खास बनवून परिधान करणं अशा नानाविध प्रकारच्या कितीतरी गोष्टी सिनेसृष्टीत अभिनेत्रींकडून करण्यात आल्याचं आजवर पहायला मिळालं आहे.
अर्थातच यावेळी बात आहे ती म्हणजे, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दलची. ऐश्वर्याने आजवर जेव्हा केव्हाही एखाद्या कार्यक्रमाकरता हजेरी लावली आहे तेव्हा तेव्हा अगदी क्षणार्धात आसपासच्या सर्व नजरा तिने तिच्याकडेच आकर्षून घेतल्या आहेत.
ऐश्वर्याला एकप्रकारे निश्चितच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाल्याचं आपण आजवर पाहिलंच आहे. आणि ऐश्वर्याने जेव्हा केव्हा एखादा हटके लुक स्वत:वर ट्राय केलेला आहे तेव्हा तेव्हाही ती अगदीच मनमोहक आणि सोंदर्याचा जणू साक्षात नगिना अशी पहायला मिळाली आहे. याखेरीज सांगायचं म्हटलं तर अनेकदा सिनेअभिनेत्र्या या पारंपारिक पद्धतीने अगदी सहजरित्या साज चढवून कार्यक्रमात हजेरी लावतात.
तर ऐश्वर्याच्या अशाच एका शोमधून तिचा यावेळी जबरदस्त लुक व्हायरलं होत असल्याचं पहायला मिळतं आहे. तिने या कार्यक्रमात फक्त साडीच्या पेहरावात असताना आपल्या सौंदर्याने आणि साडीच्या रंगाने खुलून गेलेल्या दृश्याने रसिकप्रेक्षकांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकवला आहे. मुळात या पेहरावात ऐश्वर्या जणू एक स्वर्गातील अप्सराच वाटतं होती.
ऐश्वर्या राय हिने जेव्हा एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा तिने लाल रंगाची साडी आपल्या अंगावर परिधान केली होती. यावेळी तिच्या साडीला फारकाही डिझाईनचा लवलेश नव्हता अगदी साध्या आणि सहजतेने परिपूर्ण असलेल्या त्या साडीच्या बॉर्डरवर केवळ चंदेरी आणि चॉकलेटी रंगाचं विणकाम करण्यात आलेलं होतं.
यावर काळ्या रंगाचा उठावदार ब्लाऊज पिस आणि सोबत कानात झुमके, हातात लटकेच असलेल्या बांगड्या आणि केसात माळलेला गजरा अशा स्वरूपातल्या ऐश्वर्याला पाहता हर एक चाहत्यांच्या मनात असेच काही शब्द फुटत होते जणू आपण स्वर्गातली अप्सरा साक्षात पाहतो आहोत. ऐश्वर्याच्या चाहत्यांची संख्या तमाम इतरही देशभरातून आहे. तिच्या आजवरच्या हरएक अदाकारीचे प्रत्येकजण चाहते झालेले आहेत.
ऐश्वर्याच्या खुलत्या चेहर्यावर लाल रंगाच्या साडीने असा काही साज चढवला जणू आपण एखाद्या इंद्रदरबारात उभे राहून त्याच्या अप्सरेला पाहतो आहोत की काय? ऐश्वर्या सध्यातरी कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नसली तरीदेखील तिने आजवर तिच्या कामांमधून जी छबी रसिकप्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे तिची ती जागा अर्थात इतर कोणतीही अभिनेत्री घेऊ शकणार नाही.
ऐश्वर्या राव ही एकप्रकारे आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे, याबाबत काहीच दुमत नाही. ऐश्वर्या सध्या तिची मुलगी आराध्या हिच्याकडे फार लक्ष देताना आणि तिचा व्यवस्थितरित्या सांभाळ करताना पहायला मिळत आहे. ऐश्वर्याने आजवर फार चांगल्या प्रकारचे सिनेमे या हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. खरतरं आजच्या नवख्या अनेक अभिनेत्री ऐश्वर्या समोर फिक्या पडतील.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!