गेल्या काही दिवसांपासून काही बॉलीवुडमधील कलाकारांच्या खाजगी आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत, त्यांच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असलेली पहायला मिळते आहे. आणि त्यात म्हटलं तर बॉलीवुडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिच्याबद्दल तर खुपच काही गोष्टी किचकट होऊन बसल्याच पहायला मिळतं.
सुनिधी चौहान हिच्याबाबत गेल्या काही दिवसांमधे बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्याच्या पहायला मिळतं होत्या. परंतु तसं असलं तरीदेखील सध्याच्या घडीला सारकाही तिने सावरून घेतल्याच पहायला मिळतं आहे. सध्या सुनिधी तिच्या बाळाचे फोटोजदेखील सोशल मीडियावर शेअर करत असल्याची पहायला मिळते आहे. सुनिधी तिच्या गायनाने नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनावर आजवर अधिराज्य गाजवत आल्याची आपण पाहिलं आहे.
हिंदी सिनेसृष्टीत कदाचित तिच्याइतक्या बहारदार गायिका इतर क्वचितच आहेत. हिंदी सिनेमांमधून अनेक गाण्यांना आपला आवाज देणारी सुनिधी चौहान फार उत्तमरित्या सध्याला तिच्या खाजगी आयुष्यालाही सावरताना पहायला मिळते आहे. तर मुळात मुद्दा असा निर्माण होतो की, नेमका असा काय वा’द तिचा तिच्या पतीसोबत झाला होता आणि दोघेही अगदी वेगळे होण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंतही का आले होते?
तर आता जाणून घेऊयात या गोष्टीवरील सविस्तर माहितीबद्दल. सुनिधी आणि तिचा नवरा हितेश या दोघांच 2012 सालात लग्न झालं होतं. त्यानंतर गोव्यासारख्या आलीशान ठिकाणी दोघांनी लग्नाचं मोठ रिसेप्शनदेखील आयोजित केलं होतं. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच सुनिधीने तिच्या लिटल चॅम्पला जन्म दिला. आणि सुनिधी तिच्या खाजगी आयुष्यातही बऱ्यापैकी गुंतून गेली.
काही दिवसांपूर्वीच सुनिधीचा पती हितेश आणि सुनिधी वेगळे झाल्याच्या बातम्या सर्व मिडीयात रंगल्या होत्या, या बातम्यांच्या गोष्टींच खं’ड’ण करायला हितेश मिडीयासमोर आला होता. हितेशने असं काही झालं नसल्याचे स्पष्ट केलं होतं. सुनिधी मात्र बराच काळ दोघांमधे निर्माण झालेल्या दरीवर अथवा त्यांच्यातील वा’दावर काहीच आजवर बोलली नव्हती, परंतु तिनेदेखील आता मौन सोडत याबाबत खुलासा केला आहे.
सुनिधी म्हणते, आमच्यात सध्या सारकाही ठिक चाललेलं आहे. आम्ही कुठल्याच अ’ड’च’णी’तून सध्यातरी जात नाही आहोत. इ-टाईम्सला तिने नुकतीच याबाबत मुलाखत दिली आहे. वैवाहिक जीवनात बरीचशी उलथापालथ झाल्याने दोघांमधे दुरावा जरूर आला होता. परंतु दोघांनीही एकमेकांना समजून घेत गोष्टी पॅचअप केल्याच समजत आहे. शिवाय हितेश आणि सुनिधी यानंतर एकत्र व्हॅकेशनवर आनंद घेताना पहायला मिळाले होते.
याखेरीज या व्हॅकेशनवरून आल्यानंतरही दोघांमधे काही मतभे’द चालूच होते परंतु त्या मतभे’दां’वर दोघांनीही आपापसात चर्चा करत मात केल्याची समजते आहे. सुनिधीने आजवर अनेक गाण्यांमधून अनेक सिनेमांमधून पार्श्वगायनाची भुमिका पार पाडली आहे.
तिने तब्बल वयाच्या 12 व्या वर्षी एका सिनेमासाठी गाणं म्हटलं होतं, इतकी कौशल्यपूर्ण आणि गोड गळ्याची गायिका आजही बॉलीवुडवर अधिराज्य गाजवत आहे. फिल्मफेअर, आयफा, झी सिने, गिमी अवॉर्ड्स यांसारखे कितीतरी अवॉर्ड्स तिच्या नावावर आहेत. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण सुनिधीने आजवर तब्बल दोन हजार पाचशे गाणी रेकॉर्ड केलेली आहेत, तेदेखील दहा विविध भाषांमधून. सुनिधी खरचं एक अप्रतिम कलाकार आहे यात काहीच शंका नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!