कोरोनामुळे जगाचं बरच आर्थिक नुकसान झालेलं आहे. विषाणूमुळे जवळजवळ प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था हादरली आहे. परंतु या काळात काही लोक असे आहेत, कि त्यांची संपत्ती खूप वाढली आहे. फोर्ब्सच्या शंभर लोकांच्या यादीनुसार सध्या जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण ? तर अमेझॉन चे संस्थापक जेफ बेरोज आहेत. त्यांच्याकडे जवळजवळ १७५ बिलियन डॉलर ची संपत्ती आहे. दुर्दैव असं कि या लिस्ट मध्ये पहिल्या पाचात एक ही भारतीय नाही. पण सहाव्या नंबरवर मात्र मुकेश अंबानींच्या रूपातला भारतीय आहे.
प्रत्येकजण आज कमावून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याच्या प्रवासाला लागलेला आहे. तरीही आपल्या माहितीकरिता आज आम्ही आपल्याला अश्या एका व्यक्ती बद्दल सांगणार आहोत, कि त्याच्या संपत्ती पर्यंत या लिस्ट मधील कुणीच खेटु शकलेलं नाहीये. म्हणजे तो इतका श्रीमंत दानशूर होता, कि अंबानीची सगळी प्रॉपर्टी इतकं तर तो फक्त एका वेळेला दान करायचा. हेही तितकच खरं आहे, कि याच दानशूर कारणांमुळे तो आणि त्याचा सारा देश कंगाल झाला होता. चला तर मग जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात.
इतिहासात जगातील सर्वांत श्रीमंत राजा म्हणून आफ्रिका खंडातील माली साम्राज्याचा ‘ मनसा मुसा ’ याचं नाव घेतलं जातं. तो जगातील सर्वांत उदार, श्रीमंत आणि दिलदार राजा होता. राजा मुसाचा जन्म १२८० मध्ये माली मध्ये राज्य करणाऱ्या मोठ्या राजघराण्यात झाला होता. जेव्हा राजा मुसा लहान होता, म्हणून तो साम्राज्यापासून थोडा अलिप्त होता. पण जेव्हा त्याचा मोठा भाऊ एका मोहिमेवरून परत येऊ शकला नाही. तेव्हा त्याला साम्राज्याचा जवाबरीचा वारसा मिळाला.
राजा मुसा हा आफ्रिका खंडातील ‘ माली ’ देशाचा राजा होता. त्यावेळी तिथं सोनं आणि अन्य जास्त किंमतीच्या वस्तूंचा फार मोठ्या प्रमाणात व्यापार केला जात असे. ज्यामुळे माली देशाला खूप फायदा व्हायचा. आर्थिक स्थितीही मजबूत व्हायची. त्याकाळी असं म्हंटलं जातं कि माली देशात जगाचं अर्ध सोनं होतं. म्हणजे बघा सोन्याची खान असलेला देश म्हंटलं तरी हरकत नाही.
राजा मुसाचा स्वभाव हा फार शांत, प्रेमळ आणि उदार होता. हेच कारण असायचं कि तो कुणीही मदत मागितली तर लगेच भलं मोठं सोनं दान करायचा. एकेदिवशी काय झालं कि राजा मुसा हजच्या यात्रेला चालला होता. तीन महिन्यांच्या या प्रवासाला त्याच्या सोबत राज्याचे ६० हजार लोकं होते. हे राजा मुसाला काही परवडलं नाही. उदारमतवादी धोरणामुळे घेतलेला निर्णय राज्याच्या तिजोरीवर बोजा बनला. कारण ६० हजार लोकांचा संपूर्ण खर्च घेणं म्हणजे काही दिसतं तेवढं सोपं नाही. या यात्रे दरम्यान राजाने लोकांना खूप सोनं दान केलं. ज्याचा फार मोठा भार आर्थिक ठेवीवर पडला.
सध्याच्या आर्थिक गणिताच्या अंदाजानुसार राजा मुसाला त्यावेळी तब्बल १०० अरब पेक्षाही जास्त नुकसान सहन करावं लागलं होतं. ज्यामुळे राज्य डबघाईस आलेलं होतं. बरं हे झालं राजाच्या सोनं प्रकरणाबाबत; पण राजा मुसा जनतेचं भलं शोधणारा ही राजा होता. आफ्रिका मध्ये शिक्षण सुरु होण्यास त्याचा खूप मोलाचा हातभार होता. साहित्य, कला आणि वास्तुकला यामध्ये त्याला फार इंटरेस्ट होता.
राजा मुसाच्या संपत्तीबद्दल काही कागदपत्रे मात्र अजूनही उपलब्ध नाहीत. कि एकूण किती संपत्ती होती. पण तो त्याकाळी जगातील सर्वांत श्रीमंत राजा होता एवढं खरं आहे…