तुम्ही गरियाबंद या जिल्ह्याला काही दिवसांपासून एक वेगळा स्वतंत्र जिल्हा स्थापन झाला यामुळे ओळखत असाल, पण या जिल्ह्य़ात एक महत्वाची अचंबित करणारी कथा दडलिये. तर आज या लेखातून टाकूयात एक नजर यासंबंधीच्या बाबीवर. गरियाबंद हा जिल्हा छत्तीसगड या राज्यातील आहे. आपल्या सर्वांनाच एक गोष्ट ज्ञात आहे ती म्हणजे आपण कायम महादेवांची पूजा ही त्यांच्या लिंगस्वरूपात आढळणाऱ्या पिंडीची करत असतो.पण कधी विचार केलात का? जर समजा एखाद्या शिवलिगांचा आकार हा हळूहळू दिवसेंदिवस वाढू लागला तर…!

होय. असं होत आहे, आणि ही घटना आहे ती गरियाबंद जिल्ह्यातील एका घनदाट जंगलात “मरौदा गाव” येथे स्थित असलेल्या शिवलिंगाची. या शिवलिंगाबाबत येथील स्थानिकांमधे नेहमीच कुतूहलाच व जिव्हाळ्याचही नात राहिलं आहे. आजवरच्या सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपेक्षादेखील अधिक उंचीच हे शिवलिंग पाहता क्षणीच डोळे दिपावून टाकतं.

महादेवांच्या बारा ज्योतीर्लिंगांना जेवढ आपण मानतो तेवढ्याच भक्तीभावाने त्यांचे पूजनही करत असतो. खरतरं गरियाबंदच्या या जंगलात वाढणाऱ्या शिवलिंगाची उंची दरवर्षी वाढल्याची आपल्याला फरकाने जाणून येते. परंतु हे शिवलिंग छोट्याश्या कणाकणात दिवसेंदिवस वाढत असण्याची शक्यता वर्तविली जाते.

असं मानल जातं की, या शिवलिंगाची स्थापना येथे कोणाकडून करण्यात आली नसून ती नैसर्गिकरित्या झाली आहे. काही काळ स्वत: महादेव एका रूपात येथे वास्तव्यास होते आणि त्यांच्या त्या रूपाचं असं वाढणं चालूच रहायच. या रूपाला “भूतेश्वर-महादेव” असं संबोधलं जात. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते.

या शिवलिंगाची विशेष बाब म्हणायची तर हीच की, याचा आजचा वाढलेला आकार काहीसा गोलाकार असला तरी काही ठिकाणी ओबडधोबड जाणवतो, या अर्थी या शिवलिंगात काहीतरी रहस्य दडलयं हे मात्र निश्चितच आहे. वर्षांनुवर्षे आकार बदलणाऱ्या या शिवलिंगाची अफाट महीमा स्थानिकांमधे पहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.