भरत जाधवचे बालपण गेले ते लालबाग परळमध्ये. राजकमल स्टूडीओच्या आवारातल्या चाळीमध्ये. लघोरी,गोट्या,क्रिकेट असे अनेक खेळ खेळणारा हा मुलगा मराठी सिनेसृष्टीतला सूपर स्टार होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. ८५ हून अधिक मराठी चित्रपट, ८ मालिका आणि ८५०० हून अधिक नाटकांचे प्रयोग करणारा आणि उत्तम विनोदाची जाण असणारा हरहुन्नरी मराठी अभिनेता म्हणजेच भरत जाधव.

भरत ज्या ठिकाणी राहत होता त्या चाळीत येणाय्रा एका ईसमाला पाहायला चाळीतले सगळेच लोक जात. त्या इसमाला भरपूर मानसम्मान द्यायचे. चाळीचा मालक म्हणून त्यांची छबी भरतच्या मनात कायम होती.परंतू त्याला त्यांच्या कामाच्या पेशा कोणता हेच ठावूच नव्हते.

जेव्हा भरत चित्रपठ सृष्टीत काम करु लागल्यावर त्याला समजले की हे इसम जेष्ठ चित्रपती व्हि.शांताराम बापू आहेत. मंगेश दत्त हे एकदा भरतच्या घरी आले त्याचा मोठा भाऊ नाचण्यात निपूण होता. त्याला शाहीर साबळेंच्या “महाराष्ट्रतील लोकधारा” या कार्यक्रमात घेवून जायला आले.

त्यावेळेस त्याने नकार दिला, आणि भरतने कार्यक्रमात सामिल होण्याची ईच्छा दर्शवली आणि भरतच्या आयुष्याला कलाटनी मिळाली.शाहीर साबळेंकडून भरतला केवळ प्रेरणाच नव्हे तर विनोदाचं अचूक टायमिंग त्याला शिकायला मिळालं.

शाहीरांचा नातू केदार शिंदेची भरतशी मैत्री जमली.भरतने आणि केदारनं शाहीर साबळेंना गळ घातली, की भारुड आम्हाला करण्याची संधी द्या. आणि शाहिरांनी ते ऐकलं. “दादला नको गं बाई” हे भारुड उत्तम प्रकारे दोघांनी साकारलं आणि साबळेंनी यापुढील प्रत्येक प्रयोग या दोघांकडून करवून घेण्याचे ठरविले. त्याक्षणापासून भरतचे सोनेरी दिवस सुरू झाले.

यानंतर भरत “प्राण जाए पर वचन ना जाए”,”वास्तव”,”पी से पी एम तक” यांसारख्या हिंदी सिनेमांमधून झळकला. अनेक विनोदी भूमिका करणाय्रा याच कलाकारानं “बकूळा नामदेव घोटाळे ” मद्ये निगेटिव्ह विनोदी भूमिका साकारली.

“मुक्काम पोस्ट लंडन”,”शिक्षणाच्या आयचा घो”,”रिंगा रिंगा”,”क्षणभर विश्रांती”यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनयाच्या निरनिराळ्या शैलिच दर्शन लोकांना करून दिलं. एक साध्या टॅक्सी ड्राव्हरचा मुलगा बघता-बघता आज अनेकांचा प्रेरणास्थान बनला.

आज भरत मराठीतला यशस्वी कलाकारापैकी एक आहे. कारण कोणीतरी म्हटलंच आहे, “मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनों मे उडान होती है”. सिनेमासृष्टीतला भरत जाधव हा पहिलाच अभिनेता आहे त्याच्याजवळ स्वत:ची व्हेनेटी कार आहे. मेहनती तसेच हरहुन्नरी महान कलाकाराला मनाचा मुजरा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.