घरातील कामे करण्याचा आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो. मात्र भाजी चिरणे हे काम कोणालाच पसंत नाही. त्यात कांदा चिरणे हे काम तर कोणालाच पसंत नाही कारण कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते तर हाताला विचित्र वास येतो. पण तुम्हाला कांदा नसेल आवडत तर हे नक्की वाचा.कच्चा कांदा खाऊन आपण अनेक आजारांपासून दुर राहु शकतो.
पचनासाठी कच्चा कांदा हा अतिशय उपयोगी खाद्यपदार्थ आहे. कच्च्या कांद्यात फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने तुमच्या शरीराच्या आतड्यांना चिपकलेलं अन्न योग्य रितीने पचन होतं. सकाळी जर योग्य पद्धतीने तुमचं पोट साफ होत नसेल तर रात्री जेवताना सलाडमध्ये कच्च्या कांदाचा समावेश करावा. सकाळी पोटसाफ करण्यास कांदा खुप महत्त्वाचा आहे. तसेच दातांमधून रक्त येत असेल तर कच्चा कांदा गरम करुम दाताखाली ठेवला तर तुम्हाला फरक जाणवेल.
अनकेदा काही लोकांना गळ्याची समस्या सारखी भेडसावत असते, तर अशा लोकांसाठी कांदा फार लाभदायक मानला जातो. कच्च्या कांदाच्या रस काढून तो मधात मिसळून दिवसातून दोनदा घेतला तर रोज आठवडाभर घेतल्यास तुम्हाला फरक जाणवेल. सर्दी, खोकला आणि गळ्यातील खवखव करणं बंद होईल.
इतर उपयोग : कच्चा कांदा कॅन्सर सेल्सचं प्रमाण शरीरात वाढू देत नाही. तसेच युरीन संबंधित आजारावर कांदा उपयोगी आहे. कांद्यात असलेलं सल्फर अॅनिमियापासून या आजारापासून बचाव करु शकतो.