After ‘Balak Palak’ Rohit Phalke will be seen in ‘Manjha’

826

Upcoming Marathi Movie Manjha 2017

‘बालक पालक’ नंतर रोहितचा ‘मांजा’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या बालक पालक या सुपरहिट चित्रपटामधील मधील अव्याचं अभ्यासू पात्रसाकारणारा बालकलाकार रोहित फाळकेने त्याच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली, त्याने वठवल्याभूमिकेची वाहवा पण झाली. रोहित त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘बे दुणे दहा’ या मालिकेतून & बापट& यापात्राद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचसोबत रोहितला प्रेक्षकांनी जाहिरातींमध्ये देखील पाहिले आहे. शाळेतअसल्यापासून रोहित हा थिएटरमध्ये निपुण आहे. रोहितला बालक पालकमध्ये बालकलाकार म्हणूनपाहिल्यानंतर आता मांजा चित्रपटामधील रोहितची हटके भूमिका बघणे रंजक ठरेल. मांजा या चित्रपटातरोहित ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासोबत सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटामुळेअश्विनी भावे सारख्या मात्तबर अभिनेत्री सोबत काम करण्याची संधी रोहितला मिळाली. रोहितसोबत सुमेधमुद्गलकरदेखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

जतीन वागळे दिग्दर्शित मांजा हा चित्रपट २१ जुलै रोजी जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे.पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी या चित्रपटाची इंडिया स्टोरीज या बॅनरखाली निर्मिती केली असून MFDC या कंपनीने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे.

नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची MFDC हि कंपनी मराठी चित्रपट निर्मिती आणि वितरण याक्षेत्रात कार्यरत आहे.