Baghtos Kay Mujra Kar Review




Baghtos Kay Mujra Kar Marathi Movie Review 

 

  • Movie Name : Baghtos Kay Mujra Kar (2017) |  बघतोस काय मुजरा कर !
  • Producer : Gopal Taiwade Patil & Vaishnavi Jadhav
  • Director : Hemant Dhome
  • Star Cast : Jitendra Joshi, Hemant Dhome, Aniket Vishwasrao, Raika Sunil, Parna Pethe, Neha Joshi, Vikram Gokhale

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गड आणि किल्ले. शिवरायांचा ज्वलंत इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देतच असतो. पण, महाराजांनी उभारलेल्या गडकोटांची होणारी उपेक्षा, इतिहासाचा विपर्यास पाहून शिवरायांच्या नावाचा वापर केवळ उदाहरणादाखल केला जातो आहे. पण त्याच गडकिल्लांची आज काय अवस्था करून ठेवलीय, शिवकालीन ऐतिहासिक गोष्टीची माहिती, त्याची जाणीव करून देणं ही काळाची गरज आहे याला अनुसरून बघतोस काय मुजरा कर हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Baghtos Kay Mujra Kar 2017 ‘बघतोस काय मुजरा कर’...नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. साता-यातील खरबुजेवाडी येथे राहणारे तीन वाघ म्हणजेच जितेंद्र जोशी नानासाहेब देशमुख, अनिकेत विश्वासराव पांडुरंग शिंदे, अक्षय टंकसाळे शिवराज वहाडणे एका बाजूला आहेत तर राजकारणी मंडळी म्हणजेच हेमंत ढोमे समशेर पाटील एका बाजूला. सामान्य माणसांचा महाराजांबाबतील आदर आणि राजकरणातील लोकांचा महाराजांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार या सिनेमात दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्रातले गड, किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था, तर दुसरीकडे गो-या सरकारांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे. जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार बरं कुठून येत असेल. ज्या पद्धतीत गो-या सरकारांनी त्यांचा इतिहास जपून ठेवला आहे, त्यातील थोडा टक्के जरी आपण केला असता तर…

Baghtos Kay Mujra Kar 2017 Marathi Movie Mp3 & Video 




Baghtos Kay Mujra Kar Marathi Movie Songs Free Download

सिनेमाच्या एका टप्प्यातील काही भाग लंडन येथे शूट करण्यात आला आहे. जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार सहज जाऊ शकतो हे यातून स्पष्टपणे दिसून आलं आहे.  महाराजाचं स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे हे किती  महत्त्वाचे आहे, हे यातून दाखवण्यात आले आहे. जितेद्रं जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे यांनी केलेलं हे काम आजच्या पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे. पर्णा पेठे, नेहा जोशी, रसिका सुनिल, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग यांच काम देखील पाहण्यासारखं आहे. तसेच सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच हेमंत ढोमे याने स्वत: सिनेमात खलनायकाची भूमिका देखील चोख पार पाडली आहे.  पाहुणे कलाकार म्हणून श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी ही छान भूमिका पार पाडल्या आहेत.

 

महाराजांविषयीचा आदर, सन्मान जागृत होण्यासाठी सिनेमाच्या कथेबरोबरच त्याला साथ लाभली ती अमितराज आणि क्षितीज पटवर्धन यांच्या गाण्यांची. गीतकार क्षितीज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज या दोघांच्या भन्नाट जोडीमुळे ह्या गाण्यांना अजून चारचॉंद लागले आहेत. तसेच हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सिध्दार्थ महादेवन, आदर्श शिंदे यांनी या गाण्यांना आवाज देऊन मंत्रमुग्ध केलं आहे. तसेच या सिनेमाच्या छायांकनाची जबाबदारी मिलिंद जोग यांनी  सांभाळली आहे.

 

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि गणराज प्रॉडक्शन प्रस्तुत बघतोस काय मुजरा कर या सिनेमाची निर्मिती  संजय छाब्रिया,  गोपाल तायवाडे -पाटील आणि वैष्णवी जाधव यांनी केली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता असलेला हेमंत ढोमेला सुचलेली ही संकल्पना, त्यांने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेला प्रामाणिक प्रयत्न, गडकिल्ल्यांबाबतची त्यांची ही तळमळ त्याने कॉमेडी, गंभीर पण तितकाच मनाला चटका बसेल अश्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुमच्या रक्तात जर शिवरायाचं रक्त सळसळत असेल तर हा सिनेमा जरूर पाहायला जा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here