मुळात आत्मा अथवा भूत असे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ह्रदयातून प्रत्येकाचा थरकाप हा उडतोच. पण आज ज्या तुम्हाला एका अशा भटकणाऱ्या आत्माबद्दल आम्ही सांगू जे ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलेल. तुम्हाला ही गोष्ट कळल्यानंतर कदाचीत आम्यांबद्दलही सहानुभूती वाटायला लागेल आणि मुळात आता ही बातमी जिथली आहे त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून फेरफटका नक्की मारालं.

देशप्रेम केवढ्या आत्मियतेच असावं ह्याची ही खरी प्रतिमाच म्हणावी लागेल. तर पाहुयात या निडर लढवय्या सैनिकाच्या या अनोख्या हिम्मतीची ही कहानी.

“हीरो आॅफ नथुला” या नावाने ओळखले जाणारे “बाबा हरभजनसिंग” यांची ही देशप्रेमाची गोष्ट आहे. “भूवन बाम” या प्रसिद्ध युट्यूबवरच्या एका शाॅर्टफिल्म नंतर बाबा हरभजनसिंग यांची गौरवकथा जगासमोर थोडी माहित झाली. या शाॅर्टफिल्मचं नाव होतं, “प्लस-मायनस”.

भारत हा विविधतेनने नटलेला देश आहे आणि प्रत्येक भारतीयाला आपल्या सिमेवर रक्षण करणाऱ्या हर-एक सैनिकाबद्दल अतुट प्रेम आहे. असं मानलं जात की, “मृत्यूनंतरही बाबा हरभजनसिंग यांची आत्मा सिमेवरील ठिकाणी देशाच्या रक्षणार्थ सरंक्षणीय पेहरा देते. ही गोष्ट मुळत: सुरू होते ती 30 आॅगस्ट 1946 पासून.

मुळात त्या काळात विभाजनात नसलेल्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हरभजनसिंग यांचा जन्म झाला. नंतर भारतातच विलीन झालेल्या बाबा हरभजनसिंग यांनी आपलं शिक्षण गावातच पूर्ण केलं व त्यांनी आर्मीत प्रवेश केला. सुरूवातीला पंजाब रिजमेंट मधे रूजू झालेल्या या सैनिकाने नंतर रजपूत रिजमेंट मधून सैनिकाची पाकिस्तानच्या विरोधातील लढाईत महत्वाची भूमिका निभावली.

एकदा सिक्कीम व तिबेट बेटांमधे तैनात असताना 14,500 फुटांवरून सैनिकांच्या सामानांची देवाणघेवाण चालू असतानाच उंचीवरून पडून त्यांच शरीर ग्लेशियरमधे अडकून शरीरावर बर्फाचा पूर्ण जम बसला. ही घटना घडली ती घाटी होती “नथुला”. त्यांच्या पार्थिवाला ग्लेशियरमधून काढण्यात आले ते तब्बल तीन दिवस उलटल्यानंतर.

महत्वाची बाब म्हणजे, जेव्हा सैनिकांची टीम त्यांच शरीर शोधू शकली नव्हती तेव्हा स्वत: त्यांची आत्मा मित्राच्या स्वप्नात येऊन पार्थिव शरीराची जागा सांगून गेली आणि त्यानंतर कुठे त्यांच्या शरीराचा शोध लागला. जे ही घडलं ते अजब होतं. बाबा हरभजनसिंग हे महावीर चक्राने सन्मानित केले गेले आहेत.

ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला, वय केवळ 22 वर्षे होतं पण स्वत:च्या तल्लक बुद्धीच्या जोरावर सैनिकांमधे त्यांनी चांगलीच छाप उमटवली होती. असं मानलं जातं की, भारत विरूद्ध चीन झालेल्या लढाईतही आपल्या सैनिकांना स्वप्नात येऊन त्यांच्या आत्मेने बरेच इशारे आणि पूर्वसूचना देऊन मदत केली होती.

आजही जेव्हा नथूला या प्रांतात चीनकडून कधी एखादी मिटींग घेतल्या गेली तर त्यांचे सैनिक बाबा हरभजनसिंग यांच्या आदाराखातर एक खुर्ची रिकामी ठेवूनच पुढची मिटींग चालवतात. सगळ्यात नोटीस करता येणारी बाब म्हणालं तर “बाबा हरभजनसिंग” यांच्या कपड्यांवर बसलेली धूळ इतर कोणीच साफ करू शकत नाही परंतु स्वत: त्यांच्या आत्म्याकडून कपडे स्वच्छ केले जातात.

सैनिकांमधील व लोकांमधील त्यांच्या वाढलेल्या प्रेमापोटी सर्व त्यांना हल्ली “बाबा” या नावे पुकारतात. दरवर्षी ११ सप्टेंबर या दिवशी रेल्वेमधून त्यांच सामान त्यांच्या गावी आर्मीकडून पाठवण्यात येतं. नथुला या गावी त्यांच मंदीरदेखील आहे. प्रत्येक भारतीय सैनिक त्यांना आदराने पुजतो व आपलं काम चोखपणे बजावतो. शेवटी एकच सांगेन अशा देशप्रेमी सैनिकांच्या या जज्ब्याला ह्रदयातून सलाम आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.