मित्रांनो!, एखादी अभिनेत्री जेव्हा झी मराठीवरील कोणत्याही मालिकेत अभिनय करते, नंतर त्या अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळणे सहाजिकच आहे. रात्रीस खेळ चाले-२ या मालिकेत शेवंता चा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री बद्दल पण असेच काहीतरी घडले. शेवंताचे खरे नाव अपूर्वा नेमळेकर असून या मालिकेमुळे प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले.

शेवंता आणि अण्णा नाईक या दोघामुळे मालिका प्रसिद्धीच्या झोतात आली. रात्रीस खेळ चाले पर्व दोन मधल्या आकर्षणाच केंद्र अन लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या शेवंताविषयी आपण आज जाणून घेऊया. शेवंताच खर नाव अपूर्वा नेमळेकर आहे. अपूर्वा नेमळेकर रोज रात्रीस खेळ चाले मधून शेवंता बनून आपल्या समोर येते. शेवांतच वय ३१ वर्षे इतके आहे.

अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ ला मुंबईच्या दादर येथे झाला. दादर भागातच ती लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे. खूप कमी मी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की अपूर्वा चा विवाह झाला होता.

तिचा विवाह १८ डिसेंबर २०१४ रोजी रोहन देशपांडे यांच्याशी झाला होता. रोहन हे राजकारणात सक्रिय असून ते शिवसेनेच्या युवा सेनेने मध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करीत असतात. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहन उपस्थिती लावताना दिसत असतात. अपूर्वाने तिच्या इंस्टाग्राम बायो मध्ये हॅप्पीली सिंगल असे टाकले आहे. त्यामुळे रोहन सोबतच्या विवाहाचे पुढे काय झाले? हे रहस्य मात्र अद्यापही उघड झालेले नाहीय. असो…

अपूर्वच्या details आणि सोशल मीडिया स्टेटसनुसार नुसार सध्या अपूर्वा सिंगल असून आई-वडीलांसोबत राहते आहे. तिच्या वडिलांचे नाव सुभाष नेमळेकर तर आईचे नाव सुप्रिया आहे. गौरवर्णीय अपूर्वाची उंची ५ फुट ४ इंच. कलाक्षेत्रात येण्याआधी ती, बँकेत नोकरी करत होती. सोबतच तिने स्वतःच्या Event Marketing कंपनीसाठीसुद्धा काम केल आहे.

सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली. इश्क वाला लव, भाकरखाडी, अन accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय.

अत्यंत मानाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने जिंकलाय. जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स च्या branding मुळे ती चौकाचौकात पोहचली, अन २०१५ मध्ये अपूर्वा ने स्वतःचे “अपूर्वा कलेक्शन” नावाचे ज्वेलरी शॉप देखील सुरू केले आहे. तिचे हे शॉप दादर मधील निर्मळ नर्सिंग होम जवळ आहे.