अण्णा हजारेंच्या उपस्थितीत ‘अण्णा’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Anna Marathi Movie

किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. अण्णांनी माहितीच्या अधिकारासाठी, भ्रष्टाचार विरोधी आंदोलने केली. समाजासाठी आंदोलने करुन त्यांनी जनजागृतीची कामं केलं. या महान व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘अण्णा’ हे आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन –लिखाण शशांक उदापूरकर यांनी केले आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी अण्णा हजारे यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

दि राईज पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘अण्णा’ या चित्रपटात तनीषा मुखर्जी, गोविंद नामदेव, शरत सक्सेना, किशोर कदम, दयाशंकर पांडे, प्रसन्न केतकर, अतुल श्रीवास्तव,अश्विनी गिरि, अनंत जोग, शशि श्रीवास्तव, मजहर खान यांचा अभिनय आहे.

“अरविंद केजरीवाल पार्टीत गेले माझा रस्ता समाजाच्या व देशाच्या भलाई साठी संघर्ष करत राहणे हा आहे. देशातील नागरिक ज्या प्रेमाने माझ्या मागे उभे राहिले त्यांच्या मुळेच मी आजही वयाच्या ७९ व्या साली सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करतो आहे. जर लवकरात लवकर लोकपाल बिल आले नाही तर पुन्हा माझी वाट हि रामलीला मैदान असेल. आता तुम्हाला आण्णा हजारे बनावयास हवे प्रत्येक वेळेस मी एकटाच किती संघर्ष करणार आता तुम्ही हि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करावयास हवा”, असं आण्णा म्हणाले.

“लाखो रुपये ज्यांच्या कडे आहेत त्यांना वातानुकुलीत खोली मध्ये सुद्धा झोपेची गोळी घेवून झोपावे लागते मात्र माझ्या कडे काही नाही मी देवळात राहतो माझे एक अंथरूण व जेवणाची थाळी पण मला शांत झोप लागते. रामलीला मैदानातील घटनेने भ्रष्टाचार संपला का तर नाही पण करोडे रुपये खर्च करून सुद्धा लोकांमध्ये जी जागृती आली नसती ती या घटनेन आली आणि हेच याचे यश आहे”, असेही आण्णांनी सांगितलं.

Anna First Look Movie Poster

दिग्दर्शक लेखक व अभिनेते शशांक उदापुरकर अण्णा हजारेंची भूमिका करणार आहेत. शशांक उदापुरकर म्हणाले “अण्णा हजारे मिल्ट्री मध्ये होते तेव्हा ते जिथे पोस्टिंग ला होते त्या तिथे जाऊन शूटिंग करण्यात आले आहे. अन्नाचा गेट अप करण्या साठी मला ३ तास लागायचे. या चित्रपटाच्या शेवटी अण्णा स्वत: येणार असून त्यांचे मनोगत असेल.”

या चित्रपटाद्वारे आता लाखो लोकांपर्यंत हा मेसेज जाईल व देशातील अधिकाधिक लोकांमध्ये जागृती येईल हेच या चित्रपटाचे यश असेल. या देशाला जर भविष्य द्यावयाचे असेल तर संघर्ष करताच राहावा लागेल. लोकांचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे.

या चित्रपटाची निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक उदापूरकर आणि अनिरुध्द गायकर यांनी केली आहे.

ANNA MARATHI MOVIE POSTER

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here