सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लगीनघाई दिसून येत आहे. अनेक स्टार्स लग्नाच्या बे’डी’त अडकत आहेत. नुकतंच अभिनेता वरुण धवन हा त्याची बालमैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ह्याने ही त्याची प्रेयसी अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. असं वाटत आहे ह्या यादीत आता अंकिता लोखंडे हिचं ही नाव लवकरच जोडल्या जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. ह्यावेळी ही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या लग्नामुळे. असं वाटत आहे की अंकिता लोखंडे पूर्वीच सगळं विसरून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

अंकिता नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते. अंकिताचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ह्यात अंकिताच्या हातांवर मेहंदी दिसून येत असून ती खूप आनंदी दिसत आहे.

ह्या फोटोंमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये दिसून येत आहे. हे फोटो पाहून असा अंदाज लावू शकतो की सध्या अंकिताच्या घरी तिच्या लग्नाची लगीनघाई सुरू आहे आणि गुपचूप तिने मेहंदीचा समारंभ ही उरकला आहे.

फोटो मध्ये अंकिता आणि तिचा प्रियकर विकी दोघेही ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसून येत आहेत. शिवाय त्यांच्या दोघांच्या हातावरची मेहंदीची डिजाईन ही सारखीच आहे.

अंकिता आणि अशिताने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ह्या फोटोजमध्ये कार्यक्रमात अंकिताचे काही खास मित्र आणि नातेवाईक ही उपस्थित असल्याचं दिसून येतं आहे.

अंकिता नेहमीच तिचे आणि प्रियकर विकीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे मेहंदीचे फोटोज पाहून अंकिता इतर ही कार्यक्रमांचे काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करणार का ह्याची चाहते वाट पाहत आहेत शिवाय ती खरंच विकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे का ह्याबद्दल संभ्रमात ही आहेत.

अंकिता बऱ्याच दिवसांपासून विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ह्या पूर्वी ती दि’वं’ग’त अभिनेता सुशांतसिंग राजपूत ह्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. अंकिता आणि सुशांतची भेट पवित्र रिश्ताच्या सेटवर झाली होती. ह्या मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं. अंकिता आणि सुशांत लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चा ही होत्या पण नंतर दोघेही वेगळे झाले.

सुशांतच्या मृ’त्यू’नंतर अंकिता बऱ्याचवेळा चर्चेत आली होती. सुशांतच्या जयंती निमित्त तिने त्याच्या आठवणींना उजाळा देत काही थ्रोबॅक व्हिडीओज ही शेअर केले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.