सध्या झी मराठी वर एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे आणि प्रेक्षकांना आपल्या कडे खेचत आहे. ती म्हणजे माझा होशील ना. हि जेव्हापासून सुरू झाली तेव्हा पासून खूप चर्चेत राहणारी मालिका आहे. त्यातील लीड साकारणाऱ्या दोन्ही कलाकार अभिनेते अभिनेत्री यांचा अभिनय उत्तम आहे.

पण काय होतं ना काही कलाकार हे मोठ्या घरातून आलेले असतात. ते चाहत्यांना माहीत नसतं. माझा होशील ना मधील प्रमुख भूमिका करणारा अभिनेता एका मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री चा मुलगा आहे . कुणाचा तर ते चला जाणून घेऊयात.

झी मराठीची सध्या “माझा होशील ना?” ही मालिका टॉपला आहे. इतर मालिकांपेक्षा माझा होशील ना या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालेले पाहायला मिळत आहे. या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता विराजस कुलकर्णी याची आई कोण आहे हे जाणून घेतल्यास तुम्हीही थक्क व्हाल. कारण तिला आपण सगळे सोनपरी म्हणूनही ओळखतो. हो आत्ता तुम्हाला खाडी भनक लागली असेल.

माझा होशील ना? मालिकेत आदित्यची भूमिका साकारणाऱ्या विराजसची खऱ्या आयुष्यातील आईचे नाव आहे मृणाल कुलकर्णी.

एके काळी मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने आपल्या सोंदर्याने सर्वच स्तराच्या प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तसेच, मृणालने अशा काही मालिकेत काम केले होते जे प्रेक्षकांना आजही स्मरणात असतील.

स्टार प्लस वाहिनीवर सण 2000 मध्ये सोनपरी नामक एक मालिका सुरू झाली होती. या मालिकेत मृणाल ने सोनपरीची भूमिका साकारली होती. राजा शिवछत्रपती, अवंतिका, दौपदी या मालिकेत देखील मृणाल आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तसेच मृणाल ने मेड इन चायना, लेकर हम दीवाना दील अशा काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

मृणाल ने फतेशिकस्त, फर्जंद, रमा माधव, येल्लो, बबन अशा काही गाजलेल्या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तिने प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. विराजस हा जरी मृणाल कुलकर्णीचा मुलगा असला तरी अभिनयाचा वारसा त्याने स्वबळावर पुढे नेला आहे.

सोनपरी म्हणून तर ती घराघरात पोचली होती. तसं आजही ती खूप काम करते. तिचं काम आजही अनेकांना आवडतं. लाखो चाहते तिचे मराठी मध्ये आहेत. तर तिला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वीराजस ला ही शुभेच्छा.