ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

अभिनेत्री मैथ्थिली जावकर धाडसी महिलेच्या भूमिकेत

actress-maiththili-javkar-brave-womans-role

& टिव्ही’ (& TV) चॅनेलवरील ‘होशियार’ या मालिकेत झळकणार
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री मैथ्थिली जावकर हिंदी मालिकेत एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या मालिकांमध्ये  ‘होशियार’ या ‘& टिव्ही’ चॅनेलवरील नवी मालिका आपले वेगळेपण दाखवायला सज्ज आहे. या एपिसोडिक मालिकेत येत्या शनिवारी म्हणजेच ७ जानेवारी रोजी प्रसारित होणार्या एपिसोडमध्ये एका महत्त्वाच्या मुख्य भूमिकेत आपली मराठमोळी अभिनेत्री मैथ्थिली झळकणार आहे.
actress-maiththili-javkar-brave-womans-role1
मुलींची तस्करी करणार्या एका टोळीचा सामना करत त्यांना पोलीसात पकडून देणार्या एका धाडसी महिलेची भूमिका मैथ्थिली साकारणार आहे.  तिच्या या धाडसाची कहाणी शनिवारी ७ जानेवारी रोजी रात्री १० ते ११ वाजता आणि पुन: प्रसारण रविवार ८ जानेवारी रोजी सकाळी ११:३०वाजता फक्त ‘& टिव्ही’वर पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here