राणादा या पात्राला चाहत्यांनी छोट्या पडद्यावर आजवर खुप सारं प्रेम दिल्याच आपल्याला पहायला मिळालं आहे. “तुझ्यात जिव रंगला” या मालिकेमधील राणादा याने, “चालतयं की” या एका हुकलाईनच्या जोरावरच कित्येक रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

पण मुळातच राणादा या पात्राची भुमिका निभावणाऱ्या हार्दिक पटेल याने अशी नवी घोषणा केल्याच कानावर पडलं आहे. या त्याच्या घोषणेची सर्व सोशल मीडियावर अगदी चौकड ठिकठिकाणी चर्चा रंगल्याची पहायला मिळते आहे. ही गोष्ट आहे त्याने सुरू केलेल्या नव्या व्यवसायाबाबतची. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. “कोल्हापूर बदाम थंडाई” हा देशी ब्रॅण्ड त्याने विक्री करण्यास सुरूवात केल्याची माहिती दिली आहे.

हा त्याचा स्वत:चा ब्रॅण्ड आहे. हार्दिक जोशी पोस्ट शेअर करताना म्हणाला की, आजवर तुम्ही रसिकप्रेक्षकांनी माझ्या कामावर खुप प्रेम केलं, यापुढे मी व्यवसायात पदार्पण करत आहे, आपला पाठींबा कायम माझ्यासोबत राहिल हा माझा विश्वास आहे, कोल्हापूर बदाम थंडाई आपल्या सेवेत आणली आहे… मग काय येणार नव्हं? यायला लागतयं, चालतयं की.

अशा आशयाची पोस्ट हार्दिक याने शेअर केल्याची पहायला मिळते आहे. राणादा अर्थात हार्दिक व्यवसायाकडे वळलेला पाहून अनेकांनी त्याच्या या निर्णयाची फारच तारीफ केली आहे. २०१५ मध्ये आलेल्या रंगा पतंगा या सिनेमातून हार्दिकची सिनेसृष्टीत मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. पण एकप्रकारे त्याला खऱ्या अर्थानं रसिकप्रेक्षकांचं प्रेम मिळालं ते तुझ्यात जीव रंगला या मालिकेतूनच.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि पाठकबाई या जोडीला रसिकप्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम दिलं आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघे या मालिकेत मुख्य भुमिकेत पहायला मिळाले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांची छोट्या पडद्यावरील लव्हस्टोरी नेहमीच सोशल मिडियावरही चर्चेत राहिली आहे.

अनेकांच्या मते त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री फार छान वाटते. हार्दिक जोशी वैयक्तिक आयुष्यातही अगदी पहिलवानासारखाच तगडा आणि हट्टाकट्टा आहे. हार्दिकला व्यायामाचीही आवड आहे. सोबतच तो ढोलवादकदेखील आहे. हार्दिक याला याआधी प्रेक्षकांनी राधा ही बावरी, अस्मिता, क्राईम पेट्रोल, दुर्वा आणि स्वप्नांच्या पलीकडले यांसारख्या मालिकांमधून पाहिले आहे.

हार्दिक जोशी त्याच्या कलाकृतीच्या बाबतीत फार साधा, सरळ आणि अगदी नैसर्गिकरित्या भुमिका साकारत असल्याच आजवर पहायला मिळालं आहे. हार्दिक जोशी हल्ली अलीकडेच सोशल मीडियावर फार सक्रीय राहत असल्याचं पहायला मिळतं आहे.

आणि शिवाय त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने शेअर केलेल्या फोटोज आणि व्हिडिओज यांनाही प्रेक्षकांचा फार उत्तम सपोर्ट मिळताना दिसत आहे. सध्या जेव्हा हार्दिक व्यवसायाकडे वळल्याच पहायला मिळतं आहे, अनेकांना मनात त्याच्या पुढच्या कलाकार म्हणून साकारणाऱ्या करियरचीही शंका उपस्थित राहू लागल्याचं दिसतं आहे. परंतु राणादा पुढील गोष्टी काय आणि कशा पद्धतीने मार्गी लावणार हे पाहणं अधिकच रूचकर ठरेलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!