मित्रांनो! बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत सदैव सदाबहार एक्ट्रेस म्हणून ओळखली जाणारी रेखा जिने तिच्या काळामध्ये ही चित्रपट सृष्टी खूपच गाजवली होती. अमिताभ पासून जितेंद्र, धर्मेंद्र पर्यंतच्या सर्व कलाकारांचे बरोबर काम करणाऱ्या रेखाच्या जीवनात अनेक बरे-वाईट प्रसंग नेहमीच घडले आहेत. रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत राहात असते. काही काळापूर्वी तर रेखावर सतत काही ना काही चर्चा होत असे. रेखालासुद्धा तिच्या करियरच्या सुरुवातीचे काही दिवस बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.
आता वळूया मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे अमीर खानकडे. आमीर खान हे बॉलीवूड मधील असे एक नाव आहे ज्यांनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये खूपच यश मिळवले आहे. आमिर खान खूप परफेक्ट असाच चित्रपट निवडतात त्यामुळे त्यांना प्रत्येक चित्रपटात यश मिळतेच आणि कदाचित त्यामुळेच त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट असे देखील म्हटले जाते. वर्षभरातून आमिर खान केवळ मोजकेच चित्रपट करतात परंतु त्यांचे चित्रपट लोकप्रिय देखील ठरतात.
मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, रेखा आणि अमीर खान यांनी कधीही एकमेकांसोबत काम केले नाही. दोघेही एकमेकांना खूपदा भेटत असतात, बोलत असतात आणि एकमेकांचा खूपच आदर देखील करतात. परंतु आजवर एकाही चित्रपटात दोघांनी सोबत काम केले नाही. का बरें रेखा आणि आमिर खान एकमेकांसोबत चित्रपट करत नाहीत? याचे खरे कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावे लागेल…
तर घडले असे होते की, सन १९८० मध्ये आलेला चित्रपट लॉकेटमध्ये रेखा यांनी काम केले होते. आमिर खान यांचे पिता ताहीर हुसेन यांच्या कुशल डायरेक्शनखाली बनलेला हा चित्रपट होता. वडिलांच्या चित्रपट सेटवर आमिर खान देखील जात होते. तेव्हा आमिर खान यांनी सुरुवातीपासूनच रेखा यांना अगदी जवळून पाहिले आहे. रेखा यांनी चित्रपट शूटिंग सुरू असताना बरेचसे शूटस कॅन्सल केले. आमिरच्या वडिलांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचेही खूप नुकसान देखील केले. चित्रपटाची री शूटिंग सुद्धा अनेकदा झाली. अगदी कठोर परिश्रमानंतर हा चित्रपट शूटिंग करून पूर्ण झाला.
या चित्रपट पूर्ण करण्यासाठी रेखामुळे अमीर खानच्या वडिलांना खूपच संघर्ष करावा लागला होता आणि हे आमीरने खूपच जवळून पाहिले होते. रेखाचे तेव्हाचे असे अनप्रोफेशनल वागणे आमिरला अजिबात आवडले नाही. वेळेचे महत्व तर आमीरला खूपच आहे. आमिर खान आपल्या चित्रपट निवडताना त्यामध्ये कशाप्रकारे आपले पात्र आहे, कशा प्रकारे आपले संवाद आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करत आहे. आपल्याबरोबर कोण कोणते कलाकार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करतात. रेखाचे काम मुडी स्वभावाचे आहे आणि याच कारणामुळे आमिर खान यांनी कधीही रेखा बरोबर काम केलेले नाही.