मराठी प्रेक्षकांसाठी युट्युबच्या माध्यमातून नवीन शेलिबिटी टॉक शो एपीजी लर्निंग व स्टार मराठी युट्यूब वाहिनीचा सयुंक्त उपक्रम सध्याच्या इंटरनेटच्या जगात ऑनलाईन माध्यमांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे मनोरंजन करणारे कार्यक्रम आपल्या भेटीला येत आहेत. मराठी प्रेक्षकांचा प्रेक्षकवर्ग जरी जास्त असला तरी ऑनलाईनच्या माध्यमातून खूप कमी ‘शेलिबिटी टॉक शो’ आहेत. युट्युबवरील सुप्रसिद्ध स्टार मराठी या वाहिनीवर ‘आईच्या गावात, शेलिबिटी दारात’ हा नवीन सेलेब्रिटी टॉक शो लवकरच येत आहे. या टॉक शोमध्ये आपले मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक भागात सेलेब्रिटीसह या कार्यक्रमाचे सूत्र संचालक रफिक पठाण व विनोदी अभिनेते नितीन कर्जतकर असणार आहेत.
या शोच्या पहिल्या भागात ‘गावाकडच्या गोष्टी’ व पहिला मराठी वेब सिनेमा ‘संतुर्की’ ची पूर्ण टीम आपल्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात तुम्हाला संत्या, सुर्की, अव्या, माधुरी , बापू तसेच दिग्दर्शक नितीन पवार यांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोडक्शन ‘साईशा मोशन पिक्चर्स’ तर्फे करण्यात येत असून अप्पासाहेब माकोने या कार्यक्रमाचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच NEXON MEDIATECH PVT.LTD चे गणेश काटकर व दिनेश हिवरकर या कार्यक्रमाचे निर्माते आहेत.
एपीजी लर्निंग व स्टार मराठीच्या सयुंक्त उपक्रमातून एपीजी लर्निंगच्या फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांना यातून एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेलेब्रिटी टॉक शोचे पहिल्या टप्प्यात २५ भाग तयार करण्यात आहेत व यापुढेही असेच अनेक कार्यक्रम आपल्याला एपीजी लर्निंग व स्टार मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळतील.