Vatpaurnima Special Colors Marathi

1931

Vatpaurnima Special Colors Marathi

कलर्स मराठीवरील चाहूल आणि सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा !

चाहूल मालिकेत शांभवीसमोर येणार वाड्यातील भुताचे रहस्य

सरस्वतीसमोर राघवचे एक वेगळे रूप येणार

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस Vatpaurnima  “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. सावित्रीने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील Chahul चाहूल आणि Saraswati सरस्वती या मालिकेमध्ये देखील शांभवी आणि सरस्वतीने वटपौर्णिमा साजरी केली. सरस्वतीने छान अशी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, गजरा घातला आहे तर शांभवीने केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे.

चाहूल मालिकेमध्ये वाड्यातील सगळ्या बायका उत्साहात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार असून शारदा, जानकी शांभवीला देखील त्यांच्यासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला घेउन जाणार आहेत. याचदिवशी शांभवीच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे, तिला वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या रहस्याबद्दल एक चाहूल लागणार आहे आणि या रहास्यामागे असलेला एक प्रश्न सुटणार आहे. त्याच होणार आह असं कि, शारदा आणि जानकी वटपौर्णिमेची पूजा करतानाच वडाच्या झाडाभोवती एक धागा तरंगतो आहे म्हणजेच कोणतरी ते सुत वडाच्या झाडाभोवती गुंडाळत आहे. हे पाहून शारदा, जानकी आणि इतर जमलेल्या बायकांनादेखील धक्का बसतो पण, हे सगळ होत असतानाच शांभवीच्या लक्षात येत कि, वाड्यामधील भूत हे कोणी पुरुष, लहान मुल नसून एक स्त्री आहे. त्यामुळे आता आता मी कोणाच्याहि जाळ्यात नाही अडकणार हे तिला कळाले आहे. हे कळल्यामुळे आता शांभवीचा निर्मला पर्यंत पोहचण्याचा प्रवास सुरु झाला आहे हे नक्की.

याच बरोबर सरस्वती मालिकेमध्ये राघव परतल्यावर सरस्वतीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सरस्वतीची इच्छा देवाने पूर्ण केली आहे त्यामुळे ती खूप खुश आहे. छानशी अशी साडी घालून तिने वटपौर्णिमा साजरी करायची असे ठरवले आहे. सरस्वतीची वटपौर्णिमेची पूजा निर्विघ्नपणे पार पडणार देखील आहे पण अचानक असे काही घडणार आहे ज्यामुळे तिला धक्का बसणार आहे. कारण याचदिवशी सरस्वती समोर राघवचे एक वेगळे रुप समोर येणार आहे. पण, राघव असे का वागत आहेत ? मोठे मालक इतके कसे बदलले ? नक्की यामागचे कारण काय आहे ? या मागच कारण शोधण्याचा नक्कीच सरस्वती प्रयत्न करेल यात शंका नाही.

तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल आणि सरस्वतीचे वटपौर्णिमा विशेष भाग फक्त कलर्स मराठीवर.