Saha Gun Marathi Movie Review

 

  • Movie : Saha Gunn (2017) | ‘६ गुण’
  • Producer : Ujwala Gawade
  • Director : Kiran Sabhaji Gawade
  • STAR Cast : Amruta Subhash
    Archit Deodhar
    Bhushan Pradhan
    Sunil Barve
    Atul Todankar
    Panav Raorane
    Arati Solanki

बालपणाला बंदिस्त करणा-या गुणांची गोष्ट

हल्लीचं आयुष्य हे फार स्पर्धात्मक झालं आहे. या स्पर्धात्मक युगात प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे. साहजिकच शिक्षणपद्धतीत याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे लहान मुलांचे बालपण दप्तरात बंदिस्त झाले आहे. पालकांना आपला मुलगा मुलगी सतत पहिला यायला हवा असे वाटत आहे. त्यामुळे या अपेक्षांच्या ओझ्याखाली ते त्याचे बालपण विसरत चालले आहे. शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण आणि मुलांना समजून घेत शिक्षण पद्धतीवर आधारित Saha Gunn ६ गुण हा विषय या सिनेमातून मांडण्यात येत आहे.

विद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा आहे. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. १४ वर्षाचा विद्या आईने बनवलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकात अगदी नखशिखान्त बुडून गेला आहे. पुस्तकी किडा असलेला विद्या खेळ, मनोरंजन, त्याच्या अवती भोवतीतील माहिती यांमध्ये मात्र पुरेसा कमी पडला आहे. सतत अभ्यासाचं ओझं घेऊन पहिला येणारा विद्या हा शाळेपूर्ती हुशार आहे. अचानक शाळेत नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येऊ पाहतो. राजूची बरोबरी विद्या करू शकत नाही हे त्याला कुठेतरी समजतं. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी मेहनत, त्याच्या पालकांना येणारं दडपण, विद्याच्या मानसिकतेवर झालेला परिणाम तसेच हरहुन्नरी राजू समोर आपण कुठेतरी हरतोय ह्या भितीपोटी तो खचून जातो. या परिस्थितीतीला सावरण्यासाठी त्याच्या वडिलांना परदेशातून परत घरी यावे लागते, या सगळ्याचं एकूण समिकरण करून ते सिनेमात मांडण्यात आलं आहे.

सिनेमात अमृता सुभाष, अर्चीत देवधर आणि सुनिल बर्वे अशी तगडी स्टारकास्ट असली तरी त्यांचे अभिनय तितके मनाला पटणारे नाही आहेत. शिक्षण पद्धतीवर या आधी देखील बरेच सिनेमे आले, पण त्यांच्या समोर या सिनेमेने फारच निराशा केली आहे. सतत अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास यांमुळे विद्याचे जगणे फारच जड झाले आहे. सध्याच्या जगात घोकमपट्टी करत पहिला आलेल्या विद्याला बाकी कसलेचे ज्ञान नाही. पुस्तकी किड्याची किंमत आताच्या जगात निव्वळ शून्य आहे.

सिनेमात एकूण चार गाणी असून त्याचा सिनेमाशी फारसा काही ताळमेळ नाही आहे. अभ्यासाठी मुले आत्महत्या करतात ही बाब तशी चुकीची आहे. या बाबीवर विचार करून त्यावर कसा उपास काढता येईल असा विषय बहुधा सिनेमाच्या दिग्दर्शकाला मांडायचा असेल. पण मात्र तो प्रयत्न असफल झाला आहे. शिक्षण व्यवस्थेवर आधारित सहा गुण ला तुम्ही किती गुण द्याल हे तुम्हीच सिनेमागृहात जाऊन ठरवा.