Twitter war between Neha & Lalit नेहा आणि ललितमध्ये ट्विटर वॉर

सर्व सिलेब्रिटीजसाठी सोशल मीडिया हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमी वेळात पोहोचण्याचं एक महत्वाचंसाधन आहे. आपल्या फॅन्सना आपल्या बद्दल अपडेटेड ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल गोष्टी शेअर करण्यासाठी कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. याच सोशल मीडियावरकलाकार भांडतानाही दिसतात. नुकतेच महेश भूपती आणि लिअँडर पेस मधील भांडण फेसबुक आणिट्विटर वरून लोकांसमोर आलं. आता मराठी सिनेसृष्टीत देखील अशीच काही भांडणं पाहायला मिळतआहेत. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन मध्ये सध्या ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. नुकतेच नेहानेएका सुंदर ठिकाणाचा फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला होता आणि ट्विट केलं होतं "I wish Icould go to this place and ride the Highest Motorable Road In The World" त्यावर ललितने तिला टोमणामारत म्हंटले, "People just wish to travel places. नुसतं बोलून काय फायदा आहे? वेळ काढा आणि फिरा."ललिताच्या या टोमण्याला नेहाने उत्तर दिलं ते म्हणजे, "Wish you had the guts to say it to my face & I amtoo busy with my work anyway सध्या वेळ नाही आहे माझ्याकडे." आणि ललितने त्यावर सडेतोड उत्तरदेत नेहाला म्हंटले,"@FindingNeha as if we are free. इतकं काम करून आणि पैसे कमवून फायदा काय? ifyou can't fulfill ur wishes."

हे भांडणं इथेच थांबलं नाही तर काल देखील दोघांमध्ये नोकझोक झाली ती म्हणजे IPL च्या मॅचवरून.ललितने मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी उत्सुक असल्याचं ट्विट केलं आणि त्यात असाही लिहिलं कि आजतरी रोहित शर्मा नीट खेळूदे. ललितच्या या ट्विटवर, "It's so annoying when actors think they are bettercricketers and advice players on their game!" असं म्हणत नेहाने ललितला क्लीन बोल्ड केलं. पण ललितइतक्यावरच थांबला नाही तर नेहाला उलट उत्तर देण्यासाठी ललितने ट्विट केलं, " @FindingNeha फक्तक्रिकेटर्सना बघण्यासाठी ज्या मुली मॅच बघतात त्यांनी मुळात या खेळाविषयी काही बोलू नये." यावरनेहाने ललितला उत्तर दिलं कि, "People who watch tennis just for the hot miniskirts are sure to thinkothers watch cricket for similar reasons." हे ट्विटर वॉर या दोघांमंध्ये का सुरु झाल आणि हे कधीसंपणार याबद्दल अद्याप कुणालाच काही कळलेलं नाही आहे पण त्यांचे चाहते मात्र त्यांच्या परीनेदोघांनाही हा सपोर्ट करताना दिसत आहेत.