मित्रांनो! जसे की आपण सर्वजण हे जाणतोच आहोत की, बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे नुकतेच निधन झाले. अक्षयने त्याच्या आईच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती, त्यानंतर सेलेब्ससह चाहत्यांनीही त्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अक्षय कुमारच्या आईच्या निधनाच्या बातमीवर एक पत्र लिहिले आहे. अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेत्याला पत्र लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे. पीएम मोदींनी पत्रात लिहिले – “बरीच मेहनत आणि संघर्ष केल्यानंतर तुम्हाला यश मिळाले. तुम्ही मोठे नाव कमावले आणि तुमच्या समर्पणाने प्रसिद्धी मिळवली.” पंतप्रधानांनी पत्रात असेही म्हटले आहे की, अभिनेता म्हणून, अक्षयने मिळवलेले यश त्याच्या पालकांना नेहमीच अभिमान वाटेल.
View this post on Instagram
अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पीएम मोदींचे पत्र शेअर केले आणि त्यांचे आभार मानले. अक्षयने लिहिले आहे की, पीएम मोदींनी पत्रात सांगितलेल्या गोष्टी नेहमी त्याच्यासोबत असतील. पत्र शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या शोकसंदेशांबद्दल कृतज्ञता. मी आणि माझ्या दिवंगत पालकांबद्दल माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. हे सांत्वनदायक आहेत. जय अंबे, शब्द नेहमी माझ्या सोबत असतील. ”
आईच्या मृत्यूवर पोस्ट शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले – “ती माझ्यासाठी एक महत्त्वाचा भाग होती. आज मला असह्य वेदना जाणवत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी जगाला निरोप दिला आहे. ती दुसऱ्या जगात आहे. माझे कुटुंब म्हणून मी तुमच्या प्रार्थनेचा आदर करतो आणि मी एका कठीण काळातून जात आहे. ओम शांती. ”
View this post on Instagram
आईच्या अंत्यसंस्कारासाठी जरी अक्षय भारतात परतला होता तरीपण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले होते आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली. त्याच्या उर्वरित कामाची कमिटमेंट देखील चालू होती. अंत्यविधी झाल्यानंतर तो तातडीने परत आपल्या शूटिंगस्थळी परतला असून, त्याने पूर्ववत कामला सुरुवातही केली आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.
अक्षयनं नुकतंच आपला अपकमिंग सिनेमा बच्चन पांडे सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. त्याचा सूर्यवंश हा सिनेमा लवकरच रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच ३० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसेल. याशिवाय अक्षय बेलबॉटम, अतरंगी रे, रक्षाबंधन, पृथ्वीराज आणि हाऊसफुल ५ सारख्या सिनेमे रिलीज होणार आहेत.