मित्रांनो! लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज स्वयंवर इ. लग्नाच्या प्रकाराबद्दल आपण आजवर ऐकत आलेलो आहोतच. लव्ह मॅरेजमध्ये तरुण-तरुणी एकमेकांना पसंत करतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग कुटुंबाच्या परवानगीने लग्न करतात. अरेंज मॅरेजमध्ये पाहण्याचा कार्यक्रम होतो. कुंटुबाने निवडलेला मुलगा किंवा मुलगी एकमेकांना पाहतात आणि मग लग्न करतात. स्वयंवरमध्ये समोर असलेल्या किती तरी जणांमधून एकाचा जोडीदार म्हणून निवड करण्याची मुभा असते. परंतु कधी एखाद्या खेळात जसा टॉस करतात तसाच टॉस करून जोडीदार निवडल्याचं ऐकलं आहे का? नाही??? मग ही बातमी वाचाच…
टॉस जो सामान्यपणे खेळ, स्पर्धांमध्ये केला जातो. आयुष्याचा जोडीदार निवडण्यात टॉस केला म्हणजे आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. लग्नाच्या आधी घरच्यांचा होकार आणि मुला-मुलीची सहमती गरजेची आहे. परंतु कर्नाटकात टॉसच्या माध्यमातून एक लग्न निश्चित झालं आहे. कर्नाटकातील अलूर तालुक गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी एका युवकाला दोन मुलींशी अफेअर असल्यामुळे लग्नाच्या पूर्वी अनेक कठीण समस्येचा सामना करावा लागला.
लग्नाच्या वेळी या दोन्ही मुली पोहचल्या आणि दोघीही त्यांच्या मागणीवर ठाम होत्या. अखेर गावातील काही मंडळींनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टॉसचा आधार घेतला. युवकाशी फक्त माझंच लग्न होणार असं दोन्ही मुलींचं म्हणणं होतं. त्यामुळे युवकासमोर मोठी अडचण निर्माण झाली.
गाववाल्यांनी खूप समजवल्यानंतरही दोघीही ऐकण्यास तयार नव्हत्या. इतकचं नाहीतर एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. शेवटी गावकऱ्यांनी एकत्र जमत अनोखा निर्णय घेतला. नवरदेव दोन्ही मुलींपैकी कुणाशी लग्न करणार याचा निर्णय टॉसच्या आधारे घेतला जाईल. जी कुणी जिंकेल तिचं युवकासोबत लग्न लावलं जाईल असं ठरवण्यात आलं.
मीडियाच्या वृत्तानुसार एका बाँड पेपर तिघांची सही करून जो निर्णय असेल तो मानावा लागेल, अशी अटसुद्धा टॉसच्या आधी ठेवण्यात आली. जेव्हा टॉस करण्याची वेळ आली तेव्हा मात्र तरुणाने आपली इच्छा जाहीर केली. त्याला नेमकं कुणाशी लग्न करायचं आहे ते त्याने सांगितलं. ज्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला तिला त्याने मिठी मारली. मग मात्र दुसरी तरुणी संतप्त झाली आणि तिने त्या मुलाच्या सणसणीत कानशिलात लगावली. अखेर तरुणाचं खरं प्रेम उफाळून वर आलं आणि शेवटी मग लग्न कुणासोबत होणार हे ठरलं आणि टॉस करण्याची वेळच आली नाही. प्रेमात लोकं काय करतील? काही सांगता येत नाही हो…