मित्रांनो! जसे की आपण हे सर्वजण जाणतोच की, क’र्करो’ग म्हणजेच कॅ’न्स’र झालेल्या रु’ग्णांवर उपचार करणारे मुंबईतील टाटा मेमोरियल हॉ’स्पि’टल हे या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठे रु’ग्णालय आहे. इथे रुग्णांची यादी ही तितकीच मोठी आहे. दर वर्षाला येथे सुमारे ७५ हजार नव्या रु’ग्णां’वर उपचार केले जातात तर वर्षभरात साडेचार लाख रु’ग्ण पुढील उपचारांसाठी येऊन जातात. त्यामुळे अपुरी पडणारी जागा आणि मोठ्या प्रमाणात रु’ग्णांची संख्या यामुळे अनेकांचे हा’ल होत आहेत. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने या रु’ग्णालयाला आपल्या मालकीची तब्बल १२० कोटी रुपये किंमत असलेली जमीन दान केली आहे.

सध्याच्या टाटा रु’ग्णालयापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेली ही जमीन मुंबईतील 61 वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी के’मोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी आपली वडिलोपार्जित ३० हजार चौरस फुटाची जागा टाटा रु’ग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे इतर १८ दानशूर व्यक्तींनी देखील या ठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे १८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यामुळे अनेक कर्करोग असलेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार होणार आहेत. या बातमीमुळे या दानशूर नागरिकांचं खूप कौतुक होत आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दीपिका मुंडले या आपल्या आत्यासमवेत अनेकदा टाटा रुग्णालयात रक्तदानासाठी जात असत. त्यावेळी रुग्णालयातील व्यवस्थापनाचा सुरळीतपणे व वेगाने काम करण्यासाठी होणारी धांदल त्यांनी पाहिली होती. त्यामुळेच दीपिका यांनी त्यांच्या मालकीची जमिन टाटा रुग्णालयाला मे २०१८ मध्ये दान केली.

त्यानंतर आता आणखी १८ दात्यांनी मिळून या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला आहे. त्यांनी नावे न जाहीर करता अनामिक राहणे पसंत केले आहे. त्यांच्यावतीने परोपकार या धर्मादाय ट्रस्टने टाटा रुग्णालयाबरोबर बांधकामासाठीचा समजुतीचा करार केला आहे.

सध्या या रुग्णालयात १०० बेडस असून ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. परंतु आजही केमोथेरपीसाठी रुग्णांना तब्बल महिनाभर वाट पाहत राहावं लागतं. देशभरातून कॅन्सरचे रुग्ण मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. लोकांना येथे उपचार मिळतात पण त्याचवेळी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

कित्येक महिने लोक फुटपाथवर राहतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात या लोकांच्या समस्या वाढतात. रुग्णालयाजवळील फुटपाथवर रुग्ण थांबलेले दीपिका मुंडले यांनी पाहिले आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी या दानशूर व्यक्तीने रुग्णालायला मोठी मदत केली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.