मित्रांनो!, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘मेगास्टार’ चिरंजीवी यांच्याशी आपण सर्वजण सुपरिचित आहोतच त्यामुळे त्यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिरंजीवी यांनी आपल्या हटके अभिनयाने एक आदर्श निर्माण केलाय. दमदार आवाजात डायलॉग बोलण्याच्या स्टाइलमुळे ते ओळखले जातात. ज्या दिग्दर्शकांनी चिरंजीवी सोबत काम केलंय ते सुद्धा त्यांचं कौतुक करताना थकत नाहीत. आज चिरंजीवी त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या विषयी…

साऊथ सिनेमाचे सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांची लोकप्रियता केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर ते एक उत्तम चित्रपट निर्माते आणि एक थिएटर कलाकार देखील आहेत. त्यांचा पहिला टॉलिवूड चित्रपट १९७८ मध्ये रिलीज झाला. पहिल्या चित्रपटापासून चिरंजीवी ऑल राउंडर होते. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. चिरंजीवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. म्हणूनच ते आज इंडस्ट्रीचे ‘मेगास्टार’ बनले. इतकंच नव्हे तर आजच्या घडीला इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत चिरंजीवी यांचं देखील नाव घेतलं जातं.

चिरंजीवी यांचा जन्म २२ ऑगस्ट १९५५ रोजी आंध्र प्रदेशातील मोगालथुरमध्ये झाला होता. त्यांनी अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध तर केलंच आहे, पण ते अभिनयासोबत उद्योगातही आपला दबदबा निर्माण केला. चिरंजीवी यांचे वडील एक पोलीस हवालदाराची नोकरी करत होते. त्यामूळे कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच असायची. पण आज ते कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक बनले आहेत. चिरंजीवी यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

Caknowledge.com च्या अहवालानुसार चिरंजीवी आजच्या घडीला १५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. चिरंजीवी केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कमाई करत असतात. चित्रपटात अभिनय करण्याच्या फीस व्यतिरिक्त ते चित्रपटाच्या एकूण नफ्यामधूनही काही हिस्सा घेत असतात. एका ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी देखील ते भरमसाठी फीस घेत असतात.

जेव्हा दानपुण्य आणि सामाजिक कार्याचा प्रश्न येतो तेव्हा चिरंजीवी यांचं नाव सर्वात आधी येतं. ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक करदात्यांपैकी एक आहेत. चिरंजीवी हे हैदराबादमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या आलिशान बंगल्याची किंमत सुमारे २८ कोटी इतकी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंगलोरमध्ये आणखी एक नवं घर खरेदी केल्याच्या चर्चा आहेत. चिरंजीवी यांना वेगवेगळ्या आलिशान वाहनांची आवड आहे.

त्यांच्याकडे रेंज रोव्हर आणि रोल्स रॉयस अशी अनेक वाहने आहेत. त्यांच्या कारची किंमत सुमारे एक ते तीन कोटींच्या घरात आहे. रोल्स रॉयस ही कार त्यांना त्यांचा मुलगा राम चरण याने भेट दिली होती. चिरंजीवी यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आंध्र प्रदेशात प्रजा राज्यम हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी पक्षाच्या प्रारंभावेळी म्हटलं होतं, की त्यांच्या पक्षाचा मुख्य मुद्दा सामाजिक न्याय हा असणार आहे.