मित्रांनो!, आमिर खानने पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेऊन किरण रावसोबत लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी तो सुद्धा एक महागडा घटस्फोट ठरला होता, कारण त्यावेळी आमीरला रीना दत्ताला तब्बल ५० कोटी रुपये पोटगी दाखल द्यावे लागले होते. अर्थात त्या पहिल्या घटस्फोटाचे कारण प्रिती झिंटा होती.

मात्र त्यानंतर लगान या आमिर खानच्या बहुचर्चित चित्रपटाच्या वेळी आमिर आणि किरण रावचं सुत जुळलं होतं. नंतर त्यांनी लग्नं केले. १५ वर्षांचा एकत्र संसारही केला. आणि आता अचानक “गेल्या १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर एकत्र येऊन घटस्फोट घेत असल्याचे एक निवेदन दिले आहे.

“आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तरीही यामागे दंगलफेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिची आमीरशी वाढती जवळीक हेच कारण असावे अशी मीडियात चर्चा रंगलीय.

असो… तर आपण बोलत होतो ते किरण राव हिच्याविषयी. केवळ आमिर खानची पत्नी इतकीच किरण रावची ओळख नाही, परंतु तिने स्वत:चे वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. किरण एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. किरण आपल्या मेहनतीने या खास ठिकाणी पोहोचली आहे.

तिची कमाई देखील एखाद्या बड्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. बक्कळ कमाई करण्याबरोबरच किरण अनेक स्वयंसेवी संस्थांशीही संबंधित आहे. किरण राव यांचा नेट वर्थ, त्यांचे वय, करिअरची माहिती आणि वैयक्तिक जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी बरेच लोक इंटरनेट सर्च करतात.


मीडिया रिपोर्टनुसार, किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे. किरण राव यांची एकूण मालमत्ता सुमारे २० मिलिअन डॉलर्सपेक्षाही जास्त म्हणजेच जवळपास १५० करोड इतकी आहे. किरण एक सर्वाधिक कमाई करणारी महिला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे.

आमिर खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आमीर खानची एकूण मालमत्ता सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी तो तब्बल ८५ कोटी रुपये आकारतो. याशिवाय अनेक उत्पादनांच्या जाहिराती करतांना तो प्रति प्रोडक्ट १२ ते १५ कोटी रुपये कामावतोय. १८ कोटीचे घर आणि करोडोंच्या लक्झरी गाड्या आमीरच्या ताफ्यात आहेत.

किरणकडे स्वतःचे आलिशान घर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र, आपल्याकडे किती घर आहेत आणि किती वाहने आहेत, हे किरणने अद्याप कुठेही जाहीर केलेले नाही. मीडिया रिपोर्टननुसार २०२० मध्ये किरणची एकूण संपत्ती २० दशलक्ष म्हणजेच १४६ कोटी इतकी होती. आमीर खान सोबत ती अनेक कंपनीज, प्रकल्प इ. भागीदार असल्यामुळे या घटस्फोटामुळे तिच्या एकूण उत्पन्नात आणखी अनेक करोडोंची घसघशीत भर पडली आहे, हे नक्की.

२००५ मध्ये आमिर खान आणि किरण राव यांचे लग्न झाले. आता या दोघांनाही एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद आहे. किरणच्या कामाविषयी बोलायचे तर ती एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तिने ‘जाने तू… या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘तलाश’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘पिपली लाइव्ह’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासह तिने ‘धोबी घाट’चे दिग्दर्शनही केले आहे. किरण ही बॉलिवूड स्टार्स वाईफमधील सर्वात यशस्वी महिला आहे.

सुखी संसार सुरु असताना अचानक दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घातला हे अजूनही कुणाला समजू शकले नाही. एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता. पण अचानक दोघांनी घटस्फोट घेतल्यामुळे त्यांचा चाहत्यांना धक्का बसला आहे.