बॉलिवूड मध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. कारण काही गोष्टी उशिरा आपल्यासमोर येत असतात. तर आज आम्ही आपल्याला अशीच एक 80 ते 90 च्या दशकाच्या वेळची एक गोष्ट सांगणार आहोत.
ती म्हणजे अभिनेता संजय दत्त च्या घरी जो आज प्रसिद्ध व्हिलन अभिनेता म्हणून प्रस्थापित आहे. त्याच्या कामाची. म्हणजे काय तर हा अभिनेता सुरुवातीच्या काळात फक्त दीड हजारात घरी कामाला होता. किती आजचा विरोधाभास आहे ना ? पण हो हे खरे आहे. आता तो अभिनेता कोण हे जाणून घेऊ सविस्तर.
झगमगत्या दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांना पदार्पण करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कष्टाने आणि कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. असाच एक बॉलिवूडमधील अभिनेता ज्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी महिना १५०० रुपये पगारावर काम केले आहे. हे अभिनेते म्हणजे शक्ती कपूर.
शक्ती कपूर यांनी १९७२ साली रिलीज झालेला चित्रपट जानवर और इन्सानमधून बॉलिवूडमधील करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्यांना कुर्बानी चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले. आजही शक्ती कपूर यांनी साकारलेल्या निगेटिव्ह आणि कॉमेडी भूमिका प्रेक्षकांच्या घरात घर करून कायम आहेत.
शक्ती कपूर हे एक असे अभिनेते होते की त्यांनी व्हिलन कसे आणि किती प्रकरचे साकार करू शकतो हे बॉलिवूड आणि प्रेक्षकांना दाखवून दिलं. त्यामुळे त्यांचे आजही करोडो चाहते आहेत. जुने चित्रपट पाहिले की आजही त्यांच्या अभिनयाची खेळीमेळी दिसून येते.
आता आपल्याला आज ही गोष्ट खरी वाटणार नाही पण खरेतर शक्ती कपूर यांना बॉलिवूडमध्ये यायचे नव्हते. त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांना भारतीय क्रिकेट टीमचा हिस्सा बनायचे होते. मात्र नशीबाने त्यांना अभिनेता बनवले. ते बॉलिवूडमध्ये आले तेव्हा त्यांचे नाव सुनील होते. तसेच सुरूवातीला ते सिनेइंडस्ट्रीत नवखे असल्यामुळे त्यांना जास्त चित्रपटात कामदेखील मिळत नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांना संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी आसरा दिला. हे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
सुनील दत्त तसे अनेकांना मदत करणारेच होते. त्यांनी एका प्रकारे शक्ती कपूर मधील अभिनय ओळखला आणि किमान शिकेल या हेतूने कामावर ठेवलं आणि शक्ती कपूर चं नशीबच बदल लं.
याबद्दल शक्ती कपूर यांनी सांगितले की, ते मला दर महिना १५०० रुपये द्यायचे, ज्यात मी माझा खर्च भागवायचो. त्यानंतर शक्ती कपूर यांचा एक अपघात झाला होता त्यावेळी त्यांची फिरोज खान यांच्याशी भेट झाली आणि त्यांना कुर्बान हा सिनेमा मिळाला. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
शक्ती कपूर यांचा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यामध्ये समावेश होता. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही सुद्धा बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
तर असं आहे हे अनेकांना माहीत नसलेलं हे प्रकरण. शक्ती कपूर सारख्या नटाला ही काही कमी संघर्ष नव्हता हे यावरून स्पष्ट होत आहे. शक्ती कपूर आणि त्यांच्या पूर्ण कुटूंबाला पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.