आज तमाम मराठी सिनेसृष्टीबाबत मराठी मालिकांबद्दल बोलायचं म्हटलं तर खासकरून काही ठराविक कलाकारांबद्दल भरपूर बोलता येईल. म्हणजे बाकी कथानक अथवा मुख्य भुमिकेत इतर कोणतेही कलाकार असले तरी काही कलाकार असे असतात ज्यांच्या किमान एखाद्या तरी पात्राशिवाय मालिका काही पुढे जात नाहीत. तर अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल आज आपण काही खास गोष्ट जाणून घेणार आहोत, जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असल्याची पहायला मिळते आहे. तर ही अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची लाडकी असलेली रश्मी अनपट. आणि रश्मी अनपट सध्या ज्या कारणास्तव सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे ते कारण म्हणजे, तिचा बालपणीचा फोटो. अर्थातचं तिच्या या सुंदर निरागस फोटोने तमाम सोशल मीडियाचं लक्ष तिच्याकडेच ओढून घेतल्याच पहायला मिळतं आहे. रश्मीने तिच्या आईसोबतचा तिच्या अगदी लहानपणीचा हा जो फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, त्यावर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भुमिकेला न्याय देणं आणि अगदी ती भुमिका रसिकप्रेक्षकांच्या कायम मनात राहिलं असं काम करणं ही रश्मीच्या अभिनयातली कुशलता आहे असचं म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीतली लाडकी असलेली रश्मी नेहमी तिच्या वाट्याला येणाऱ्या विविधांगी भुमिकांमुळेही कायम चर्चेत राहत असल्याची पहायला मिळते. रश्मी अगदी आवडीने तिच्या वाट्याला आलेल्या विविध प्रकारच्या भुमिकांना स्विकारत आपलं काम अगदी चोखपणे पार पाडताना दिसते. रश्मीने आजवर ज्या काही विविध मालिकांमधून कामे केली आहेत त्यांपैकी एक वैशिष्ट्यपुर्ण म्हणालं तर “कुलस्वामिनी” ही मालिका. या मालिकेतील तिच्या पात्राच्या प्रसिद्धीने प्रकाशझोताचा अगदी कळसचं गाठला होता असं म्हणता येईल.
रश्मी अनपट हिच्याबाबत अगदी ठराविक असं बोलायचं म्हटलं तर तिने तिच्या सिनेसृष्टीतल्या करियरची पाऊलवाट ही नाटकांमधून चालायला सुरू केली. गाठीभेटी, स्वभावाला औषध नाही यांसारख्या नाटकांमधून तिने काम केलं. विशेष बाब म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातली येसूबाईंची भुमिकादेखील तिने रंगमंचावर वठवली आणि योग्यरित्या निभावली आहे. सुहासिनी मालिकेतून ती पुढचा मार्ग चालत असताना तिच्या वाट्याला पुढचं पाऊलं ही मालिका आली. पुढचं पाऊल मधूनही तिने चांगली लोकप्रियता कमावली. “असावा सुंदर स्वप्नांचा बंगला”, “फ्रेशर्स”, “कुलस्वामिनी”, “अग्नीहोत्र भाग २” यांसारख्या मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची बखुबीने छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवली.
विशेष बाब म्हणजे रश्मीचा पतीदेखील एक अभिनेत्री आहे. त्याने हिरकणी, ह्रदयांतर या सिनेमातून काम केलेलं आहे, अमित खेडेकर हे त्याच नावं. गेल्या काही काळापासून असं म्हणावं लागेल की एखादी मालिका आली आणि त्यात रश्मीकाची भुमिका असणार नाही असं होणं क्वचितचं. मुळात रश्मी अनपट सध्या “आई माझी काळुबाई” या मालिकेमधील आर्या या पात्राची भुमिका साकारताना पहायला मिळते आहे. रश्मी तिच्या बऱ्याच गोष्टी इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असल्याची पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत सतत संपर्कातही असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडिओजदेखील शेअर करत असल्याची पहायला मिळते. रश्मी तिच्या भुमिकांमधून नेहमी एक नव्या दमाची कलाकृती सदाबहार म्हणून उमटवून जाते. ही अशी खुबी क्वचितच कलाकारांमधे पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!