रूषी कपूर यांनी दिलेली अंगठी डिंपल कपाडियांनी दिली चक्क समुद्रात फेकून, पहा नेमकं काय घडलं?
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलीवुडमधील दिग्गज आणि कायमचे दर्जेदार सुपरस्टार अभिनेते असलेले रूषी कपूर आणि सदाबहार अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यात घडलेला हा किस्सा आहे, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मुळात सिनेसृष्टीत काही कलाकारांचे प्रेमप्रकरण हे फारसे टिकत नाहीत अथवा अनेकदा काही ना काही अडथळे निर्माण झाल्याने त्या प्रेमप्रकरणांना तडा हा जातोच. मुळात ही गोष्टच काहीशी अशी आहे. त्या काळात डिंपल कपाडिया आणि रूषी कपूर यांचा एक एकत्र सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं, “बॉबी”. खरतरं हा सिनेमा दोघांच्याही आयुष्यातला फार महत्वाचा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चांगलाच सुपरहिट ठरला. आणि या सिनेमाने त्या काळात अगदीच चांगल्या प्रसिद्धीसोबतच कमाईसुद्धा केली.

या सिनेमाच्या शुटींगदरम्यानच एकमेकांना पहिल्यांदाच भेटलेल्या रूषी व डिंपल यांची चांगली मैत्री जमू लागली होती. हळूहळू ती मैत्री प्रेमात बददली आणि या दोघांबद्दलच्या नानाविध प्रकारच्या बातम्या सिनेसृष्टीत रंगू लागल्या. अनेकांच्या मते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडाले होते. एवढचं नाही तर चक्क रूषी कपूर यांनी डिंपल कपाडिया यांना प्रेमाच्या निशाणीप्रती चक्क अंगठी घेऊन दिली होती. परंतु दुर्दैवाने या दोघांची ही केमिस्ट्री आणि हे प्रेम फार काळ टिकू शकलं नाही. त्या काळात रूषी यांचे वडील राज कपूर यांच्या कानावर या प्रेमप्रकरणाच्या गोष्टी पडल्या, त्यांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांचा तीव्र विरोध असल्या कारणाने नाईलाजाने रूषी कपूर व डिंपल यांना नात पुढे नेण्यापासून माघार घ्यावी लागली.

बॉलीवुडमधील प्रेमप्रकरणांमधे तुट पडणं आणि त्यानंतर नवी समीकरणं जुळणं ही आजच्या घडीला तरी फार शुल्लक बाब झालेली पहायला मिळते. पण त्या काळात ते थोडसं त्रासदायक जात असतं तरी कलाकार त्या गोष्टींना दूर सारून पुन्हा नव्या मार्गाने चालण्यास सज्ज होत असतं. त्याचप्रमाणे रूषी कपूर व डिंपल यांच्यात ब्रेक-अप झाल्यानंतर डिंपल कपाडिया यांची भेट राजेश खन्ना यांच्यासोबत झाली. डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांना आधीचा साराकाही किस्सा सांगितला असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची माहिती होतीच. राजेश खन्ना यांना हेदेखील माहिती होतं की, डिंपलकडे अजूनही रूषी कपूर यांनी दिलेली अंगठी आहे. मग राजेश खन्ना यांनी डिंपलला ती अंगठी समुद्रात फेकून देण्याची मागणी केली. आणि डिंपलने देखील ती अंगठी लगोलग समुद्रात फेकून दिली. यानंतर राजेश खन्ना व डिंपल यांच लग्न पार पडलं.

राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर डिंपल कपाडिया बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून दूर राहिल्याच्या पहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर 1985 सालात जेव्हा लग्नानंतर पहिला सिनेमा त्यांनी केला तेव्हा योगायोगाने त्यांच्या सिनेमांचे हिरो हे रूषी कपूर हेच होते, या सिनेमाच नाव होतं “सागर”. बॉलीवुडमधे आपल्या कारकीर्दीत अगदी खुप कमी काळात नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या डिंपल कपाडिया आणि दुसरीकडे होते रूषी कपूर ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तमाम भारतातल्या रसिकप्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडली होती. या दोघांचीही सिनेमातील ऑनस्क्रीन जोडी जितकी गाजली, तितकीच ती ऑफस्क्रीन जागावी अशी अनेक चाहत्यांची ईच्छा मात्र अपूर्णच राहिली असं म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!