एक जमाना होता ज्या जमान्यात हिंदी सिनेसृष्टीत लहान मुलांच्या अथवा बालकलाकारांच्या भुमिकेला फार महत्वाचं वजन असायचं. आणि अनेकदा अनेक बालकलाकार हिंदी सिनेसृष्टीत एखाद्या सिनेमात काम करून आपली छाप कायमची रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटूनही जायचे. काही बालकलाकार तर आजही विसरता विसरत नसल्याचं पहायला मिळतं. तर ही. गोष्ट अशाच एका बालकलाकाराबद्दल आहे. “कभी खुशी कभी गम” हा सिनेमा शाहरूखचा मल्टीस्टारर सिनेमा होता. या सिनेमात शाहरूख सोबतच काजोल, करीना, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन यांसारखे इतर कलाकार होते. या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीतील रसिकप्रेक्षकांच्या मनावर अगदी प्रभावीपणे आपली छाप उमटवल्याची पहायला मिळाली होती.
याच सिनेमात एका बालकलाकारने चक्क शाहरूखच्या मुलाची भुमिका बजावली होती. आणि हा मुलगा आज चांगलाच मोठा झालेला पहायला मिळतो आहे. २००१ साली रिलीज झालेल्या या सिनेमात जिबरान खान याने शाहरुखच्या मुलाचा किरदार निभावला होता. आणि जिबरान खान तब्बल २० वर्षांनंतर प्रचंड बदललेला दिसून येतो आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु हा जिबरान खान एका दिग्गज आणि अभिनयात मुरलेल्या कलकाराचा मुलगा आहे, ही बात अनेक दिवस अनेकांना माहितच नव्हती. दुरदर्शन वाहिनीवर घडलेलं महाभारत आज जणू अजरामर झालं आहे. याच महाभारताच ज्या अर्जुनाची भुमिका फिरोज खान यांनी निभावली होती, त्यांचाच जिबरान खान हा मुलगा आहे. लहानपणी चेहऱ्यावर निरागस लाघवी हास्य, गोडंस असे हावभाव या सर्व गोष्टींमुळेच जिबरान याला कभी खुशी कभी गम या सिनेमात काम मिळालं होतं.
कभी खुशी कभी गम सिनेमातून जिबरानने अनेक लोकांची मने जिंकली होतीच, शिवाय तो आजली अनेकांची मने नव्याने जिंकायला सज्ज होतोयं की काय? असाच प्रश्न त्याच्या नव्या लुक्सकडे आणि त्याच्यात झालेल्या खुप साऱ्या बदलामुळे सर्वांनाच पडू लागला आहे. जिबरान खान याचा जन्म 4 डिसेंबर 1993 साली मुंबईत झाला. जिबरान खान सध्याच्या घडीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं अनेकदा पहायला मिळतो. त्याला दोन बहिणीदेखील आहेत सना आणि फराह खान अशी त्यांची नावे आहेत. जिबरान त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या फोटोशुटचे नेहमीच विविध फोटो शेअर करत असतो. त्याच्या फोटोंवर चाहत्यांचा त्याला चांगलाच प्रतिसादही सतत मिळत असल्याचं पहायला मिळतं.
जिबरान त्याच्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देत असल्याचही दिसून येत आहे. जिबरानचं शिक्षण हे मुंबईतच झालेलं आहे. इकोनॉमिक्स सारख्या महत्वाच्या विषयात त्याने पदवी घेतलेली आहे. रिश्ते, क्यों की मैं झुठ नहीं बोलता यांसारख्या सिनेमातही जिबरानने बालकलाकार म्हणून काम केल्याचं पहायला मिळालं आहे. जिबरान खानने एका मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले की, त्याला बालकलाकाराच्या अभिनेत्याची आता ओळख मोडून नव्या दमाच्या अभिनेत्याची काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तो त्याकरता चांगलीच मेहनतदेखील घेत असल्याचं पहायला मिळतं आहे. जिबरानचे वडील फिरोज खान यांच्या अर्जुनाला आजही हा तमाम भारतीय रसिकप्रेक्षक विसरू शकला नाही, हे निश्चितच खरं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!