बॉलीवुडच्या जगतात कपूर कुटुंब म्हणजे एकप्रकारे प्रस्थापित, मान असलेलं, सर्वाधिक दिग्गज कलाकार निर्माण करणारं कुटुंब समजल्या जातं. सिनेसृष्टीतल्या जगतात कपूर कुटुंबाचा एकप्रकारे लहेजाच काही इतरांपेक्षा नेहमी वेगळा राहिल्याचं पहायला मिळालं आहे. आणि अशाच कपूर कुटुंबाने आपल्याला अनेक चांगले कलाकार देत असताना, “शशी कपूर” यांसारख्या हिरादेखील दिला.
शशी कपूर यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी प्रखर्शाने पहायला मिळतात ज्यावरून सहज समजून येतं की, त्यांच्या कामाच्या कौशल्याची खुबी आणि अंदाजच काही वेगळा होता. आपली स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर शशी कपूर म्हणजे सिनेसृष्टीतील एक नामांकित व्यक्तिमत्व बनून उदयास आल्याचे पहायला मिळाले. आपला दमदार अभिनय, आपल्या आवाजातील धीरगंभीरता, प्रसंगानुरूप क्षणोक्षणी हावभाव बदलणं अशा बखुबी अभिनयाच्या जोरावर शशी कपूर यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर त्या काळात अधिराज्य गाजवलं.
मुळात तुम्हाला कदाचित याची माहिती नसेल परंतु शशी कपूर जितके सिनेमांमधून चर्चेत राहिले तेवढेच ते वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळेही चर्चेत राहिले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चर्चेत राहण्याच्या मध्यभागी एक केंद्रबिंदू त्यांची पत्नीदेखील होती. आणि अर्थातचं शशी कपूर व त्यांच्या पत्नीचं नात हे फार अतुट होतं.
खरतरं एकदा एक असा किस्सा घडला होता, ज्यावरून शमी कपूर यांच्या पत्नीने त्यांच्यावर एका गोष्टीचा संशय घेतला होता. तुम्ही म्हणालं, पती पत्नीमधे एखादवेळेस संशय घेणं वगैरे गोष्टी होतं राहतात. परंतु हा संशय थोड्या वेगळ्याच दिशेतला होता जो सहसा एखादी पत्नी आपल्या पतीबाबत क्वचित प्रसंगीच करेल. चला तर मग आपण जाणून घेऊयात नेमका हा संशय होता कशासाठी?
ज्यावेळी शशी कपूर आपल्या दमदार अभिनयातून रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले होते, नेमक्या अशाच वेळी त्यांच्या पत्नी अर्थात जेनिफर केंडल यांनी त्यांना चक्क “गे” व्यक्ती समजले होते. अर्थात हे थोडसं विचित्रच आहे. परंतु हा किस्सा का घडला यावर एक नजर टाकायला हवी.
नव्याने ज्यावेळी जेनिफर व शशी कपूर यांच्यात मैत्री होऊन ओळख झाली होती आणि ती अगदी लग्नापर्यंत येऊस्तोवर शशी कपूर एक चुक वारंवार करत असल्याचे जेनिफरने नोटीस केले होते. ही चुक अशी होती की, शशी कपूर यांना मुली अथवा महिलांसोबत खऱ्या आयुष्यात जगताना थोडीशी अडचण निर्माण व्हायची, ते स्वत:ला अनकम्फर्टेबल समजून जेनिफर भेटल्यावरदेखील तिच्यापासून दुर होण्याचा बहाणा शोधत रहायचे.
मुळात त्यांच्या अशा विचित्र वागण्याने जेनिफरला काहीतरी खोट आहे असे वाटू लागले होते. आणि ती त्यांना गे व्यक्तिमत्व समजून बसली होती. त्यांना मुलींमधे रूची नाही असा तर्क जेनिफरने काढला होता, परंतु त्यांच्या पत्नीचा हा गैरसमज त्यांनी लवकरचं दुरदेखील केला होता. ही घटना घडल्याची खुद्द शशी कपूर यांनीच एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती.
खऱ्या अर्थानं एका नाटकाच्या सरावादरम्यान जेनिफरला आणि शशी कपूर यांची ओळख पहिल्यांदा झाली होती. त्यावेळी शशी कपूर करिअरची सुरूवात करत होते, त्यांना फार प्रसिद्धी नव्हती. जेनिफर त्यांच्याबद्दल फार काही जाणून नव्हती. परंतु पहिल्या भेटीत प्रेमात पडलेल्या शशी कपूर यांनी तिच्याशी आधी मैत्री करत नंतर त्याच रूपांतर प्रेमात बदलून तिला आपल्या आयुष्यात आणलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!