हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक सिनेमांमधून विविध पद्धतीच्या भुमिका साकारलेले अभिनेते म्हणजे अनुपम खेर. अनुपम खेर यांचा नुकताच ७ मार्च रोजी जन्मदिवस पार पडला. अर्थातचं अनुपम खेर यांनी त्यांची पत्नी किरण खेर यांच्यासमवेत आपला जन्मदिवस अगदी उत्तमरित्या साजरा केला. नकारात्मक, विनोदी, सहाय्यक, कधी पिता अशा नानाविध भुमिका आजवर अनुपम खेर यांच्या वाट्याला आल्या आहेत.
अनुपम खेर सोशल मीडियावर बरेच सक्रीय असल्याच आपण आजवर पाहिलंच आहे. अनुपम खेर अनेकदा अनेक विषयांवर त्यांच मत आपल्या रसिकप्रेक्षकांसमोर व जनतेसमोर परखडपणे मांडत असतात. आपल्या वयाच्या २८ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यास अनुपम खेर यांनी सुरूवात केली. आणि त्यानंतर सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी कधीच मागे वळून न पाहता अखंड, अविरतपणे आजतागायत हा प्रवास सुरू ठेवला आहे.
अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांच्याबद्दलही अनेक बाबी आपल्याला माहित आहेत. परंतु सध्याच्या घडीला तरी एक वेगळाच खुलासा आपण याठिकाणी करणार आहोत, तो आहे थेट अनुपम खेर व किरण खेर यांच्या प्रेमकहाणीचा जी कधी, कशी, कुठे, सुरू झाली? हे जाणून घेणं थोडसं उत्सुकतेचा विषय ठरतं. खरतरं स्ट्र’ग’ल’च्या काळात अनुपम यांनी अनेक गोष्टी मिळवण्यासाठी फार प्रमाणात पायपीट केली हे आपल्याला ठाऊकच आहे.
किरण खेर या अनुपम खेर यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांना एकप्रकारे फार मदतच झाली आहे. शिवाय आज एका वेगळ्या उंचीवर ते पोहोचले आहेत. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात अनुपम खेर व किरण खेर ह्यांच्या प्रेमकहाणीची सुरूवात.
किरण खेर व अनुपम खेर हे दोघेही ज्यावेळी महाविद्यालयात आपलं शिक्षण पूर्ण करत होते त्या दरम्यान आपआपसात त्या दोघांची ओळख झाली. त्यावेळी नुकतचं मैत्री झालेल्या किरण व अनुपम या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम अथवा पुढच्या आयुष्याची शाश्वती देत लग्न वगैरे अशा काहीही गोष्टी विचारात नव्हत्या. प्रेम, लग्न, कमीटमेंट अशा गोष्टींचा कधीही त्या दोघांच्या मनात एकदाही विचार आला नाही.
मग त्यानंतर पुढे चालून जेव्हा मुंबईमधे परत त्या दोघांची भेट झाली. यावेळीदेखील दोघांमधे प्रेमाच्या भावनांचा एकमेकांबद्दल आविष्कार झालाचं नव्हता. मात्र दोघेही आपापल्या पद्धतीने सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी झगडत होते. दोघांचेही स्ट्रगलींग डेज सुरू झालेले होते. आणि नेमकं हे स्ट्रगल थोडसं पथ्यावर पडलं नी दोघांनाही एकमेकांवर प्रेम झालं. एकमेकांचा सहवास, एकमेकांचे आचारविचार पटू लागले आणि दोघांमधील अंतराची दुरी मिटली. आणि फायनली हे प्रेम होणं थोडसं कुठेतरी दोघांच्याही पथ्यावर पडलं.
तुम्हाला कदाचित खरचं ध’क्का बसेल पण स्ट्रगलच्या काळात “सारांश” सिनेमा अनुपम यांना मिळाला आणि पुढे त्यांची सिनेसृष्टीतली कामाची गाडी सुरू झाली. नेमकं याच काळात अनुपम खेर यांचा पहिल्या लग्नापासून असलेल्या पत्नीसोबत घटस्फो’ट झाला व त्याचसोबत तिकडे किरण यांचाही आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फो’ट झाला. दोघेही पुढे आपल्या हिमतीवर सिनेसृष्टीत काम करू लागले. आणि नंतर एका कार्यक्रमाच्या दरम्यान अनुपम यांनी सर्वांसमक्ष किरण यांनी लग्नाची मागणी घालत प्रपोज केलं. किरण यांनी ते स्विकारलं.
आणि पुढे दोघेही विवाहबंधनात अडकले. तुम्हाला हि गोष्ट थोडी विचित्र वाटेल परंतु अनुपम खेर यांच्या नावे अनोखा विक्रमही प्रस्थापित होण्याची भविष्यात शक्यता आहे. कारण त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत तब्बल ५०० पेक्षा अधिक सिनेमांमधे काम केलं आहे. अनुपम खेर यांना अनेक पुरस्कारदेखील देण्यात आले आहेत. लम्हें, खेल, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, हम आपके है कोन, यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपलं काम बखुबी निभावलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!