अशोक सराफ यांच्या आवाजात अशी ही बनवाबनवी मधे शंतनू हे नावं ऐकलं की अगदी प्रेमाने आपल्या छोट्या भावाला दिलेली साद लक्षात येते. खरतरं “अशी ही बनवाबनवी” हा मराठी धमाल विनोदी सिनेमा आहे. आणि या सिनेमातील एकूण एक पात्र आजही रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून राहिलं आहे.
तर अशा या मराठी सिनेमात एक पात्र होतं ज्याचं नाव होतं शंतून. या पात्राला अशोक सराफ यांचा लहान भाऊ दाखवण्यात आलं होतं. आणि हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ रे. जन्माने सुशांत रे हे त्याच नाव त्याने सिनेसृष्टीत आल्यानंतर बदललं होतं. तो वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षीच मृत्यू पावला हे दु’र्दै’व म्हणावं लागेल. ह्र’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने त्याच नि’ध’न झालं. त्याची पत्नी शांतिप्रिया हीदेखील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे.
“सिद्धार्थ रे” या अभिनेत्याबाबत सांगायच झालं तर त्याने अनेक हिंदी सिनेमे केले आहेत. याशिवाय खऱ्या अर्थानं भराठी सिनेसृष्टीतही त्याने चांगलाच जम बसवला होता. अनेकांना फार क्वचित लोकांना कदाचित माहित असेल की, त्या काळात सिद्धार्थ रे याने चक्क दाक्षिणात्य सिनेमांमधेदेखील आपल्या कामाची छाप उमटवली आहे.
मराठी सिनेसृष्टीत खऱ्या अर्थानं त्याला शंतनू या अशी ही बनवाबनवी सिनेमातील पात्राने ओळख दिली. रसिकप्रेक्षकांच्या मनावर या भुमिकेने आपली जागा कोरली. सिद्धार्थ रे एक जबरदस्त अभिनेता होता. त्याच्या वाट्याला ज्या काही भुमिका आल्या त्याने त्या अगदी सहजरित्या निभावून नेल्या. त्याच्या कलाकृतीत एक वेगळीच लकब असलेली प्रेक्षकांनी पाहिली होती.
सिद्धार्थ रे हा अभिनेता व्ही. शांताराम यांचा नातू आहे. सिद्धार्थने पहचान, वंश अशा सिनेमांमधून उत्कृष्ट भुमिका साकारत आपली कलाकृती बखुबी जगासमोर मांडली होती. बाळाचे बाप ब्रम्हचारी या मराठी सिनेमातही त्याने आपली भुमिका साकारली होती.
बाझीगर हा शाहरूख आणि काजोल सोबतचा त्याचा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. मुळात स्पेशली त्याच्यावर चित्रीत झालेलं “छुपाना भी नहीं आता” या गाण्याने तमाम भारतीय प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यासोबत आणखी काही गाण्यांमधे स्पेशली तो दिसला आहे. सिद्धार्थ याची बायकोदेखील चांगली नामांकित अभिनेत्री राहिली आहे.
तिने अक्षय कुमार याच्या सौगंध या सिनेमात काम केलेलं आहे. 1999 सालात सिद्धार्थ आणि त्याची पत्नी शांतिप्रिया यांचा विवाह झाला. दुर्दैवाने लग्नाच्या अवघ्या पाच वर्षातच सिद्धार्थ मृत्युमुखी पावला. शांतिप्रिया हिने भक्ती की शक्ती, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण अशा मालिकांमधून काम केलं आहे.
दाक्षिणात्य सिनेमांमधील प्रसिद्धीचा चेहरा असलेल्या भानुप्रियाची शांतिप्रिया ही छोटी बहिण आहे. थोडीसी बेवफाई, पनाह, चरस, मिलट्री राज, पहचान यांसारख्या अनेक हिंदी सिनेमातून सिद्धार्थने रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. सिद्धार्थ एक खऱ्या अर्थानं हरहुन्नरी कलाकार होता यात काहीच शंका नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!