रिचा चढ्ढा हे नाव तुम्ही साहजिकचं ऐकलेलं असेल. आज बॉलीवुडमधे सध्याच्या घडीला तिला अनेक चांगल्या संधी मिळत आहेत आणि तीदेखील त्यांच सोन करत यशस्वीरित्या करियरची वाट धरत असल्याच पहायला मिळतं आहे. मुळातच केवळ एक आघाडीवर येण्याव्यतिरिक्तही रिचा बॉलीवुडमधील बिनधास्त आणि बो’ल्ड अभिनेत्री म्हणून अधिक उदयास आलेली आहे.

खरतरं ती जशा परिस्थितीतून हिम्मत दाखवत आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे, तिथे निश्चितच आपल्या आस्तित्वाची मेख रोवण्याकरता कधीकधी भक्कमपणा भिनवावा लागतो. रिचा चढ्ढा एकप्रकारे बॉलीवुडच्या अनेक सिनेतारकांच्या बाबतीत नव्या जनरेशनची अभिनेत्री आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही.

पंजाबमधील ज्या अमृतसर या ठिकाणाहून ती बॉलीवुडमधे आली आहे, त्या ठिकाणी तिचं कुटुंब, घर अगदी साध्या पद्धतीने सर्वच राहतात. रिचा सर्वप्रथम दिल्लीला आल्यानंतर तिच्या करियरची सुरूवात झाली. तिने इथे मॉडेलिंग सुरू केली परंतु त्यात फार अडकून न पडता तिला कळून चुकलं आणि तिने दर्जेदार अभिनयासाठी थेट रंगभूमीचा रस्ता निवडला.

तिच्या या निर्णयाने निश्चितच तिला एक अभुतपूर्व कलागुणांनी संपन्न असलेली अभिनेत्री बनवण्यास मदत केली, याखेरीज नाटकांमधून तिला थेट पाकीस्तानच्या धर्तीवरदेखील भुमिका साकारण्याची वेळोवेळी संधी भेटत राहिली. रिचाची आई शिक्षिका तर वडील एका मॅनेजमेंट फर्म कंपनीचे मालक आहेत. तिच्या आईचे दोन पुस्तकेदेखील प्रकाशित आहेत. गांधी स्मृती या संस्थेसोबत रिचाची आई कार्यरत आहे. घरात अगदी एक सुसंगत आणि साध्या सरळ विचारसरणीच्या धाटणीतलं वातावरण राहिलं असतानादेखील आज रिचा एका पूर्णत: वेगळ्या धाटणीत जगताना पहायला मिळते आहे.

रिचा चढ्ढा हिच्या कारकिर्दीची सुरूवात जर पाहिली तर ती एका विनोदी चित्रपटाच्या कथानकावर आधारित असलेल्या भुमिकेतून झालेली पहायला मिळते. “ओए लक्की, लक्की ओए” असं या चित्रपटाचं शिर्षक होतं. परेश रावल, अभय देओल, अर्चना पुरनसिंग यांनी यात भुमिका बजावल्या होत्या.

या चित्रपटात डॅशिंग डॉलीच्या भुमिकेतली रिचा सर्व रसिकप्रेक्षकांना पहायला मिळाली होती. यातील भुमिकेनंतर तिला हळूहळू हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवण्याची आशा दिसू लागली, आणि तिने पुढेही वाट्याला आलेली भुमिका उत्तमरित्या पार पाडत सर्वांना तिची दखल घ्यायला भाग पाडलं. बेनी ॲण्ड बबलू या विनोदी कथानकाच्याच सिनेमानंतर तिला थेट कन्नडमधील निर्दोशी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

यानंतर रिच्याच्या करियरवर प्रकाश टाकला तर तो अगदी दमदार दिसेल हे निश्चित. कारण यानंतर तिच्या वाट्याला आलेले प्रोजेक्टचं अगदी भन्नाट व चाहत्यांच्या मनावर फारकाळासाठी अधिराज्य गाजवणारे ठरले. यामधे अनुराग कश्यप यांच्या “गँग्ज ऑफ वासेपुर” याचादेखील समावेश आहे.

राम लीला, फुकरे, शॉर्ट्स हेही तिच्या वाट्याला चांगले प्रोजेक्ट आले. याखेरीजही घुमकेतू आणि तमंचे या सिनेमांनी तर एक वेगळीच जादू रसिकप्रेक्षकांच्या मनावर करून सोडली. अभिनयाने प्रसिद्ध झालेल्या रिचाला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोलदेखील केल्या जातं. ती अनेकदा काही खास महिलांच्या सेंसीटीव्ह मुद्यांवरही स्पष्टपणे बोलते, याचा अनेकांना तिटकारा वाटतो परंतु बदल गरजेचा असेल तिथे ती गोष्ट ठामपणे उभी केली गेली पाहिजे हा रिचाचा मुद्दाही एकप्रकारे योग्य ठरतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!