केबीसी अर्थात कोन बनेगा करोडपती? आणि या हिंदी गाजलेल्या कार्यक्रमाच मराठीतही टेलिकास्ट झालं. केबीसी च्या हिंदी भागात अनेक लोकं येतात गेम खेळतात आणि अमिताभ बच्चन अर्थात बीग बी यांच्यासोबत गप्पाही मारतात. मागे मध्यप्रदेश येथील खंडवा या ग्रामपंचायतचे सचिव कौशलेंद्र तोमर ह्यांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावली.
अर्थात प्रत्येक व्यक्ती जेव्हा येथे खेळून जी काही रक्कम जिंकतो त्या रकमेचं तो नेमकं काय करेल? हा प्रश्न हमखास बीग बी यांच्याकडून विचारला जातो. कौशलेंद्र यांना जेव्हा हाच प्रश्न अमिताभ यांनी विचारला तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराला ऐकून अमिताभही चकीत झाले होतो.
अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाचं उत्तर कौशलेंद्र यांनी अस दिलं की, जिंकलेल्या पैशांतून ते स्वत:च्या पत्नीची प्लॅस्टिक सर्जरी करणार आहेत. कदाचित आजवर अनेक लोक येथून पैशे जिंकून गेले आणि अनेकांची उत्तर काही खास राहिली पण या उत्तराने सर्वांनाच चकीत करून सोडलं.
परंतु पुढे चालून कुतूहलाने जेव्हा अमिताभ यांनी विचारलं की नेमकं हे कशासाठी करायचं आहे तेव्हा कौशलेंद्र यांनी सांगितले की, लग्नाच्या पंधरा वर्षांपासून मी पत्नीच्या एकाच चेहऱ्याला पाहत आहे तर वेगळेपण अर्थात नवेपण आणण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करण्याची ईच्छा आहे.
त्यामुळे जेव्हा हा प्रसंग घडला तिथे कौशलेंद्र यांच्या पत्नीही उपस्थित होत्या आणि अमिताभ यांनी त्यांना तुम्ही निसर्गत: सुंदर आहात आणि प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा खराब होऊ शकतो, तर असं काही करू नका असा सल्लाही दिला. त्यानंतर कौशलेंद्र यांच्या पत्नीने हा केवळ विनोदाचा भाग आहे त्या असं काही करणार नाहीत असं सांगत ती गोष्ट टाळली.
कौशलेंद्र तोमर खेळात खुप जास्त पुढे तर नाही जाऊ शकले पण त्यांनी जाता जाता ४०,००० रूपये एवढी रक्कम नक्कीच कमावली. शेवटच्या प्रश्नावर ते चांगलेच कोंडीत सापडले हा प्रश्न स्पोर्ट अर्थात खेळाशी संबंधित होता आणि यासाठी तीन हेल्पलाईन वापरूनही त्यांना याच उत्तर देता आलं नाही.
आता कोरोना काळ ओसरत असताना केबीसी च्या १२ व्या सिजनची तयारी सुरू आहे, सर्व खबरदारी घेत केबीसी चा पुढील सिजन लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.